Take a fresh look at your lifestyle.

राखी सावंतच्या भालाफेकीचा प्रयत्न झाला वाटसरूंच्या डोक्याला ताप; व्हिडीओ वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। राखी सावंत हि एक अशी अदाकारा आहे कि तिच्या अदा भल्याभल्यांच्या अंगाशी येतात. मुळात ती कधी, कुठे, कधी आणि काय करेल याचा काडीमात्र नेम नाही. ती नेहमीच आपल्या उचापतींमुळे चर्चेत असते. आता यावेळी तिने काय केलं? असं म्हणाल तर तिला भालाफेकीचं वेड लागलं होत. अर्थात हे वेड काही असच आलेलं नाही. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकलं आणि राखीला जोश आला. मग काय राखीने लगेच सरावाला रस्त्यातच सुरुवात केली. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. त्यात ती भालाफेकीचा सराव करताना दिसते आहे. पण तिच्या हातात भाला नाही दांडा आहे आणि हा दांडा सुवर्ण पदक नव्हे लोकांचं डोकं फोडण्यास सक्षम आहे.

भारतीय भालाफेक पटू आणि ऑलीम्पिक गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राची कॉपी करत राखीने मुंबईच्या रस्त्यावर एक काठी घेऊन भालाफेकीची प्रॅक्टिस केली. पण तिचा नेम मात्र चुकला आणि ती काठी थेट एका वाटसरूच्या डोक्यावर जाऊन लागली. एकंदर काय गोल्ड मेडल ना सही… पण.. सरावाच्या नादात एकाचं डोकं तर फोडलं. अर्थात त्या व्यक्तीला फार असं लागलं नाही. पण थोडक्यात निभावलं म्हणून, नायतर राखीचा भाला तिच्या चांगलाच अंगाशी आला असता, हे नक्की. दरम्यान ‘अरे हे काय सुरु आहे,’ असा एक आवाज व्हिडीओत येतो आणि त्यावर ‘अरे मी प्रयत्न तर केला ना,’ असं राखीचं उत्तर ऐकायला मिळतं.

राखी सावंतच्या भालाफेकीचा हा एक मजेशीर व्हिडीओ आहे आणि मुख्य म्हणजे अगदी नेहमीप्रमाणे तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. सध्या राखी सावंत हि सेलिब्रिटी मीडिया फोटोग्राफर्सची आवडती सेलिब्रिटी आहे, असे म्हणायला काही हरकत नाही. कारण राखी नुसती घराबाहेर पडली की, फोटोग्राफर्स तिच्याभोवती रिंगण घालतात. पण राखीसुद्धा त्यांना कधीच हिडीस पीडीसी करताना दिसत नाही. या उलट ती त्यांचे मनोरंजन करते आणि चर्चेत येताना दिसते. तिचे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही आपसे हसू आवरणे जणू कठीण होऊ लागते.