Take a fresh look at your lifestyle.

माझी सटकली तर तू गेलीस म्हणून समज ; राखी सावंतचा कंगणावर घणाघात

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | मुंबई मला पाकव्याप्त काश्मीर सारखी का वाटतेय अस वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सर्वच स्तरातून अभिनेत्री कंगणा राणावत वर टीकेची झोड उठली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि अनेक मराठी कलाकारांनि कंगणावर निशाणा साधला आहे. अशातच ‘ड्रामाक्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत हिनेही कंगनावर चांगलेच तोंडसुख घेतले आहे.

राखी सावंतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत कंगनावर घणाघात केला आहे. “कंगना, तुझी एक अत्यंत वाईट सवय आहे. जेव्हा कोणी तुझं ऐकत नाही, तेव्हा तू बडबड करायला लागतेस. हा असा आहे, तो तसा आहे. तू विवाहित पुरुषांच्या आयुष्यात जातेस, मग तो हृतिक रोशन असो किंवा आदित्य पांचोली, हजार माणसं तुझ्या आयुष्यात आली. तू त्यांचं घर बरबाद करते आणि म्हणतेस की यांनी माझ्यासोबत असं केलं” असा आरोप राखी सावंतने केला.

“महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नकोस. सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेऊन पब्लिसिटी घेण्याचा प्रयत्न करु नकोस. कंगनाने अभिनेता सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण सलमान बोलला, चल हट गंदी, चल निकल. मोठेमोठ्या स्टार्सच्या आयुष्यात तिने जायचा प्रयत्न केला, मी त्या स्टार्सचे नाव घेऊ शकत नाही” असं राखी म्हणते.

तू हे विसरु नकोस की या महाराष्ट्रात सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतात. सुशांतसाठी तू पाऊल उचललेस ठीक आहे, पण मराठी माणसांना काही बोललीस, एक-एक मराठी माणसाशी जर तू पंगा घेशील, तर तुला महाराष्ट्रात राहणे अवघड होईल, तुला महाराष्ट्रात शूटिंग करणे अवघड होईल. “अगं ए भवाने, आमचं डोकं फिरलं ना, आता माझी सटकली तर, तू गेलीस, समज, भवाने” असा इशारा राखीने दिला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’