Take a fresh look at your lifestyle.

“तुझ्या पापांचा घडा आता भरला”; राखी सावंतने साधला रिया चक्रवर्तीवर निशाणा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच आपल्या वादग्रस्त आणि चित्रविचित्र विधानांमुळे चर्चेत असते. यावेळी तिने सुशांत मृत्यू प्रकरणाचं निमित्त साधून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि निर्माता महेश भट्ट यांच्यावर निशाणा साधला आहे. “माझ्या स्वप्नांना कॉपी करु नकोस कारण तुझ्या पापांचा घडा आता भरला आहे.” असं म्हणत तिने रियावर निशाणा साधला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होत आहे.

सध्या सीबीआय सुशांत मृत्यू प्रकरणात रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. दरम्यान या प्रकरणावर राखी सावंतने प्रतिक्रिया दिली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करुन महेश भट्ट यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. शिवाय रियावर देखील जोरदार टीका केली आहे. “रिया चक्रवर्ती तू माझ्या स्वप्नांची नक्कल करु नकोस. कारण तुझ्या पापांचा घडा आता भरला आहे. तू आणि तुझ्या कुटुंबीयांनी मिळून सुशांतला नियोजनबद्ध पद्धतीने फसवलं. परंतु आता जास्त दिवस तुम्ही वाचू शकणार नाही. सीबीआय लवकरच तुम्हाला गजाआड पाठवेल. त्यामुळे उगाचच माझी नक्कल करण्याचा प्रयत्न करु नकोस.” असा इशारा राखीने या व्हिडीओद्वारे रियाला दिला आहे. राखीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

१४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला. त्यानंतर सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती विरोधात पोलीस तक्रार केली. सध्या सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’