Take a fresh look at your lifestyle.

रश्मी देसाईचं बोल्ड फोटोशूट वायरल; तुम्ही पाहिलं का?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री रश्मी देसाई सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सातत्याने विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असते. कधी रिलेशनशिप तर कधी वाद विवाद यामुळे रश्मी नेहमी चर्चेत राहिली आहे. म्हणजे एकंदर काय तर अशी नाही तर तशी रश्मी सारखी चर्चेत असतेच. सध्या सोशल मीडियावर तिचे हॉट फोटोशूट चांगलेच चर्चेत आहे. नुकतेच रश्मी देसाईने तिच्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःच्या ह्या नव्या फोटोशूटमधील फोटो शेअर केले आहेत.

या नवीन फोटोंमध्ये रश्मी स्लीपवेअरमध्ये अंथरुणावर बसून पोज देताना दिसत आहे. यामुळे रश्मीच्या चाहत्यांच्या नजरा तिच्या फोटोंवरून हटतील असे काही वाटत नाही. तिचे हे फोटो पाहून तिचे चाहते विविध कमेंट्स करीत तिचे कौतूक करीत आहेत. इतकेच नव्हे तर टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक मोठे स्टारसुद्धा रश्मीच्या या हॉट फोटोशूटचे कौतुक करताना दिसत आहेत.

अनेक दिवसांपासून रश्मी सोशल मीडियावर तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. ज्याची खूप चर्चा देखील होते. अभिनेत्री रश्मी देसाईने आपल्या मुलाखतीत बर्‍याच वेळा असे म्हटले आहे की, ती कोणत्याही प्रकारचे बोल्ड फोटोशूट करणे टाळत नाही. टीव्हीपूर्वी रश्मी देसाईने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. येऊ लम्हे जुदाई के हा तिचा पहिला चित्रपट होता. २००६ साली रश्मीने ‘रावण’ या मालिकेतून टीव्ही जगतात पाऊल ठेवले. त्यानंतर तिने अनेक मालिकांमधून काम करीत प्रेक्षकांवर जादू केली. उतरन आणि दिल से दिल तक या लोकप्रिय मालिकेतील तिच्या भूमिकांनी विशेष पसंती मिळवली. यानंतर ती ‘बिग बॉस सीजन १३ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.