Take a fresh look at your lifestyle.

रिया चक्रवर्तीला तुरुंगात मिळतंय ‘अशा’ प्रकारचं जेवण

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | दिवंगत बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला ड्रग्स सेवन आणि अन्य आरोपांखाली एनसीबीने मंगळवारी अटक करण्यात आली आहे. मुंबई मधील भायखळा तुरुंगात रियाची रवानगी करण्यात आली आहे. अटक झाल्यानंतर रियाला सामान्य बॅरेक मध्ये ठेवण्यात आलं होतं. पण नंतर सुरक्षेच्या कारणास्तव रियाला वेगळ्या बॅरेकमध्ये पाठवण्यात आले.

रियाची रवानगी तुरुंगात झाल्यानंतर आता रियाला तुरुंगात पहिल्या दिवशी कोणतं जेवण देण्यात आलं हे देखील समोर आहे. रियाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणे ठेवण्यात आलं आहे.

तिला  एक चादर, चटई बेडशीट आणि साहित्य ठेवण्यासाठी एक पिशवी देण्यात आली आहे. तसंच रियाला तुरुंगात इतर कैद्यांप्रमाणेच जेवण देण्यात येत आहे. या जेवणामध्ये दोन पोळ्या, एक वाटी भात, एक वाटी वरण आणि एक भाजी यांचा समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’