Take a fresh look at your lifestyle.

तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू…घेऊन कृतिका येतेय; रिंकू राजगुरूचा आगामी चित्रपट प्रदर्शनास सज्ज

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिने सृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी पदार्पण करतेवेळी साकारलेल्या भूमिकांच्या नावानेच आजही प्रेक्षक त्यांना ओळखत आहेत. जसे कि सैराटमधली आर्ची. चित्रपटसृष्टीमध्ये फार कमी वेळात मोठे यश संपादन करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू हि एक अतिशय भारी अभिनेत्री आहे. आपल्या अभिनयाने अभिनेत्री रिंकु राजगुरुने प्रेक्षकांच्या मनात आपले असे एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. सैराट नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. पण गेल्या काही काळात तिने ओटीटी प्लॅटफॉर्म सुद्धा गाजवला आहे. यानंतर आता परत एकदा ती लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकू नेहमीच दमदार सादरीकरण करते. याचा प्रत्यय सैराट, कागर आणि झुंड सारख्या चित्रपटातून आला आहे. त्यानंतर रिंकूचा आगामी नवा चित्रपट आठवा रंग प्रेमाचा हा चित्रपट प्रदर्शनास सज्ज झाला आहे. आता अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. कारण आपल्या आगामी चित्रपटाबाबत आता रिंकू राजगुरूने स्वतःच माहिती दिली आहे. रिंकूच्या ‘आठवा रंग प्रेमाचा’ या चित्रपटाचं पोस्टर रिंकूने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. या चित्रपटातून रिंकू राजगुरू हि ‘कृतिका’च्या दमदार भूमिकेत दिसणार आहे. एका हटके कॅप्शन सह सोमवारी टीजर येणार आहे असे तिने सांगितले आहे.

आठवा रंग प्रेमाचा या चित्रपटाची निर्मिती राकेश राऊ, समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केले आहे. येत्या १७ जून २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटातील आर्ची या पात्राने रिंकूला विशेष लोकप्रियता देत प्रकाशझोतात आणले आहे. यानंतर रिंकूने दाक्षिणात्य चित्रपटातही आपले वर्चस्व स्थापित केले आहे. आज केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही रिंकू राजगुरूने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शिवाय ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.