Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री रुचिता जाधव अडकली विवाह बंधनात; नवऱ्यासोबत मिळून जपले सामाजिक बांधिलकीचे भान

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे शासनाने कडक निर्बंधांसह राज्यात लोकडाऊन लावला आहे. त्यामुळे धार्मिक आणि लग्न सोहळ्यावर निर्बंध आहेत. या काळात लग्न करायचे असेल तर नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. २५ पाहुणे आणि २ तासांत लग्न उरकण्याची कडक आदेश या संदर्भात दिले आहेत. दरम्यान गेल्या काही महिन्यात अनेक सेलिब्रेटी लग्नबंधनात अडकले आहेत. अनेकांनी कोरोना नियमांनुसारच लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. नुकतेच अभिनेत्री रुचिता जाधव उद्योगपती आनंद माने यांच्यासह विवाह बंधनात अडकली आहे. तसेच लग्नात कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत त्यांनी गरजू लोकांना तांदूळ आणि डाळीचे वाटप केले.

मराठी अभिनेत्री रुचिता जाधव आणि उद्योगपती आनंद माने यांचा विवाहसोहळा ३ मे २०२१ रोजी पाचगणी येथे फार्महाऊसमध्ये हा पार पडला. या अभिनेत्रींच्या विवाह सोहळ्याचा कोणत्याही पद्धतीने गाजावाजा केला नव्हता. इतकेच नव्हे तर अगदी शासनाच्या नियमांमध्ये राहून त्यांनी हा सोहळा पार पाडला आहे. या लग्नाचे खास वैशिष्ट असे कि, ठरवल्याप्रमाणे आधी संगीत कार्यक्रम होणार होता. पण या दांपत्याने त्यांचा संगीत कार्यक्रम रद्द करत पाचगणीतल्या जवळच्या गावांतील लोकांना डाळ आणि तांदूळ असणाऱ्या अश्या १५०० पाकिटांचे वाटप करत समाजिक बांधिलकी जपली आहे.

रुचिताने लग्नाचे खास फोटोही तिने चाहत्यांसह शेअर केले आहे. फोटो शेअर करताच या फोटोंवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. लग्न ठरल्यापासून प्रत्येक गोष्ट रुचिता आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसली होती. लग्नात नववधू रुचिता अतिशय सुंदर दिसत होती.

समोर आलेल्या फोटोंमध्ये नववधू रुचिताचा अंदाज अत्यंत सुंदर आणि मोहून टाकणारा होता. या नाव दांपत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल आणि मस्ती शेअर केलेल्या या फोटोत आपल्याला पाहायला मिळतेय.