Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सायरा बानो यांची प्रकृती खालावली; मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचारार्थ दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री सायरा बानो यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे त्यांना त्वरित उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायरा बानो यांना मुंबईतील पी डी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती बिघडण्यामागे उच्च रक्तदाब हे कारण असून गेले तीन दिवस त्यांना हा त्रास जाणवत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्यांचे पती अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले झाल्यामुळॆ सायरा बानो एकट्या पडल्या आहेत. अशातच त्यांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे चाहते देखील काळजीत पडले आहेत.

अनेक दिवस प्रकृतीच्या तक्रारींमुळे सायरा बानो त्रासल्या असताना अचानक ब्लड प्रेशर वाढल्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले असल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्गज अभिनेते व सायरा बानो यांचे पती दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे. यानंतर त्यांच्या मृत्यूमूळे सायरा बानो खचल्या असून एकट्या पडल्या आहेत. दरम्यान दिलीप साहब यांच्या अंत्यदर्शनाची काही छायाचित्र समोर आली होती ज्यामध्ये सायरा बानो यांची अवस्था पाहून अक्षरशः त्यांचे चाहते देखील व्याकुळ झाले होते. हि भावनिक छायाचित्रे सोशल मीडियावर वायरल होताना दिसली. काही फोटोंमध्ये अभिनेत्री सायरा बानो आपले पती दिलीप कुमार यांच्या पार्थिवाला शेवटपर्यंत बिलगून रडताना दिसल्या होत्या.

सायरा बानो यांचा चाहता वर्ग मोठा असून सर्वांचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. त्यामुळे सायरा यांची तब्येत खालावल्याने वृत्त येताच चाहते त्यांच्या सुदृढ तब्येतीसाठी प्रार्थना करू लागले आहेत. शिवाय आता त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं आणि त्या घरी याव्या यासाठी चाहते सोशल मीडियावर ‘गेट वेल सून’ अश्या पोस्ट करताना दिसत आहेत.

वयाच्या १७व्या वर्षी सायरा यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि ‘जंगली’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटातून त्यांनी अभिनयाची जादू अशी केली कि त्यांच्यासाठी अनेको लोक वेडे झाले. यानंतर दिलीप साहब यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांची प्रतिमा एक आदर्श पत्नी म्हणून समोर आली आहे.