Take a fresh look at your lifestyle.

तू आधी एक धर्म निवड..! सारा अली खानने कामाख्या देवीचे घेतले दर्शन; तर नेटकऱ्यांनी उठवले धर्मावर प्रश्न

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंग यांची लेक बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिला अभिनयासोबत भटकंतीची भारी आवड. त्यात ती सोशल मीडियावर इतकी अ‍ॅक्टिव्ह असते कि, जाईल तिथले फोटो शेअर करते. कधी काश्मीर तर कधी मालदीव.. आणि आता? आता सारा थेट आसाममधील सिद्ध कामाख्या देवीच्या मंदिरात तिचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचली. तिने यावेळचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. मात्र तिचे हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीपेक्षा प्रश्नांचे सार्थी जास्त झाले. तर काहींनी तिला धर्मावरून ट्रोल केले आहे.

या फोटोंमध्ये सारा पांढ-या रंगाच्या सलवार सूटमध्ये दिसते आहे. तर गळ्यात आसामचा पारंपरिक स्कार्फ आहे. शिवाय दर्शनानंतर माथ्यावर टिळासुद्धा आहे. साराचे हे फोटो पाहून काहींनी भरभरून कौतुक केले तर काहींनी मात्र तिला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. अनेकांनी तिच्या धर्मावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तू मुस्लिम आहेस की हिंदू? अश्या प्रश्नांचा अनेकांनी भडीमार केला आहे. तर एका युजरने नाव मुस्लिम, ओळख हिंदू…, माझा सल्ला मान आणि कोणताही एक धर्म निवड, असे लिहिले आहे. याआधीही सारा या कारणामुळे ट्रोल झाली आहे.

   

गंगा आरतीत सहभागी झाल्यावरून लोकांनी तिला अश्याच पद्धतीने धर्मावरून ट्रोल केले होते. काही महिन्यांपूर्वी सारा तिची आई अमृता सिंगसोबत अजमेर शरीफला गेली होती. त्याचे फोटोही तिने शेअर केले होते.

साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, २०१८ साली ‘केदारनाथ’ या चित्रपटातून तिने दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत स्क्रीन शेअर करीत बॉलिवूड डेब्यू केला होता. त्यानंतर तिचा रणवीर सिंगसोबत ‘सिम्बा’ चित्रपट रिलीज आला होता. पुढे २०२० मध्ये सारा कार्तिक आर्यनसोबत ‘लव्ह आज कल’ आणि वरूण धवनसोबत ‘कुली नंबर १’मध्ये दिसली होती.

यानंतर आता लवकरच सारा ‘अतरंगी रे’ या चित्रपटात झळकणार आहे. यात अभिनेता अक्षय कुमार व धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच याचे शूट संपले असून लवकरच प्रदर्शन होईल अशी माहिती आहे.