Take a fresh look at your lifestyle.

दरवाढ अशीच सुरु राहिली तर..; इंधन दरवाढीवरील अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळापासून संपूर्ण जगभरात एकीकडे कोरोनाची भीती होती तर दुसरीकडे लाईफस्टाईल पूर्ववत होण्याची घाई. यानंतर आता इंधन दरवाढीचे सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. सध्या पेट्रोल- डिझेलच्या दरात अशी झपाट्याने वाढ झाली आहे कि काही विचारायलाच नको. रविवारी हे दर ८०- ८५ पैशांनी वाढले. गेल्या १३ दिवसांत तब्बल ११ वेळा इंधनाच्या दारात वाढ झाल्याचे पाहून सगळ्यांनाच टेन्शन आलं आहे. दरम्यान अनेक पक्ष विविध प्रतिक्रिया देत आहे तसेच आंदोलनं करत आहेत. दरम्यान एका अभिनेत्रीने संबंधित विषयावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी चांगलीच चर्चेत सुद्धा आहे.

हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे हिने सोशल मीडियावर इंधन दरवाढीवर भाष्य केले आहे. तिने हि पोस्ट लिहित इंधनाच्या दरवाढीवरून चिंता व्यक्त केली आहे. दरवाढ अशीच सुरू राहिली तर मुंबई लवकरच युरोपीयन शहरासारखी होईल, असं मतदेखील तिने यामध्ये मांडले आहे. शर्मिला हि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मराठी तर ‘मेरे साई’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आहे. शर्मिलाच्या या पोस्टवर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्याचे पहायला मिळाले आहे.

शर्मिलाने देशातील महत्त्वाच्या शहरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फोटो शेअर करत त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘सायकल खरेदी करावी लागेल. काय वाटतं? रस्त्यावर सायकलींसह मुंबईसुद्धा लवकरच युरोपीयन शहरासारखी दिसू लागली तर मला आश्चर्य वाटणार नाही.’ या पोस्टवर कमेंट करीत एकाने लिहिले कि, हॅरी पॉटरचा झाडू घेऊन फिरायला लागेल. तर काहींनी शर्मिलाला सायकल विकत घेण्याचा सल्ला दिला.