Take a fresh look at your lifestyle.

पतीच्या अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टी- कुंद्राची इंस्टाग्रामवर पहिली पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या सोमवारी रात्री शिल्पा शेट्टीच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडला कि त्यानंतर शिल्पा अचानक माध्यमांपासून अतिशय लांब निघून गेली. प्रसिद्ध अशात पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने पहिल्यांदाजोक आणि शिल्पाचा पती राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट निर्मिती आणि प्रसारण या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आणि यानंतर शिल्पाने आता कुठे तिची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियाचा सहारा घेत शिल्पाने एक पोस्ट शेअर केली आहे. तिची पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी सोशल मिडियावरवर खूप सक्रिय असते. मात्र, पती राज कुंद्राच्या अटकेनंतर तिने सोशल मीडिया आणि माध्यम यांच्यापासून बरेच अंतरच राखले होते. तर शिल्पा शेट्टीने गुरुवारी रात्री, इंस्टाग्राम स्टोरीवर अमेरिकन लेखक जेम्स थर्बर यांच्या एका पुस्तकातील पानाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या पोस्टमध्ये जेम्स थर्बर यांच्या उद्धरणावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. यात असे लिहिले आहे कि, “रागात मागे पाहू नका अथवा भीतीने समोर पाहू नका, त्याऐवजी जागरूकतेनं पाहा.”

पुढे, “आपण रागात, ज्या लोकांनी आपल्याला दुखावले आहे, जी निराशा आपण अनुभवली आहे, जे दुर्दैव आपण सहन केले आहे, यांकडे मागे वळून पाहतो. आपण अशा शक्यतांना घाबरतो, की आपली नोकरी जाऊ शकते, आजार होऊ शकतो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. आपल्याला ज्या ठिकाणी राहण्याची गरज आहे, ते हेच आहे. आता – काय झाले आहे किंवा काय होऊ शकते याकडे चिंताग्रस्त होऊन पाहू नका, पण काय आहे याची जाणीव असू द्या.” “मी जिवंत राहण्यासाठी भाग्यशाली आहे, हे जाणून, मी दीर्घ श्वास घेतो. मी भूतकाळात आव्हानांचा सामना केला आहे आणि भविष्यातही मी आव्हानांचा सामना करू शकतो. आज मला माझे जीवन जगण्यापासून विचलित करण्याची काहीही आवश्यकता नाही.”

शिल्पाने या पुस्तकातील हे पान आणि मजकूर शेअर करताना अन्य असे काहीही लिहिलेले नाही. मात्र, सध्यस्थितीत शिल्पा स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी सक्षम भूमिका निभावण्याची सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे तिची हि पोस्ट तिच्यावर आलेल्या संकटात ती कशी लढा देत आहे हे दर्शवित आहे.शिवाय आपण आपले कुटुंब आणि पतीची साथ देत पुढील आव्हानांना तोंड देण्यास सक्षम आहोत अशी भूमिका शिल्पा घेताना दिसत आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.