Take a fresh look at your lifestyle.

ENTRY देखी क्या..?; आगामी वेबसीरिजच्या माध्यमातून शिल्पा शेट्टीचा OTT डेब्यू

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि तिच्या फिटनेसबाबत किती सतर्क आहे हे आपण सारेच जाणतो. सोशल मीडियावर सक्रिय असणारी शिल्पा आपले हटके लूक आणि फिटनेस ट्रिक नेहमीच चाहत्यांसह शेअर करताना दिसते. मध्यंतरीच्या एका वाईट फेजनंतर आता फुल्ल फायर शिल्पा मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. इतकेच नव्हे तर ती लवकरच OTT प्लॅटफॉर्म अर्थातच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतेय. ते हि एकदम दमदार. रोहित शेट्टीच्या आगामी कॉप वेबसीरिजच्या माध्यमातून शिल्पा एका आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे. नुकताच तिने रोहितसोबतच्या एंट्रीचा दमदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडचा ऍक्शन किंग दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत एका वेबसीरिजसाठी काम करतेय. या वेबसिरीजचे नाव आहे ‘इंडियन पुलिस फोर्स’. हि एक ८ एपिसोड्सची वेब्सिरीज आहे. जी अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतंच शिल्पा शेट्टीने तिच्या या आगामी कॉप वेबसीरिजच्या शूटींगला सुरुवात केली आहे.

शिवाय तिने तिच्या आगामी वेब सीरिजचे पोस्टरही सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासह तिने शेअर केलेला तिच्या एंट्रीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे.यामध्ये शिल्पा शेट्टीचा कडक लुक पहायला मिळतोय. तर तिने शेअर केलेल्या फोटोत तिच्या टी शर्टवर पोलीस असे लिहिलेले दिसत आहे.

हि वेब सिरीज रोहित शेट्टी दिग्दर्शित करीत असल्यामुळे यात ऍक्शनचा फुल ऑन तडका असणार आहे यात काही वादच नाही. त्यात रोहित शेट्टी स्वतः सुद्धा या वेबसिरीजवर बारकाईने काम करीत आहे. अलीकडेच या वेब सीरिजच्या माध्यमातून बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही ओटीटीवर पदार्पण करीत असल्याचे समोर आले होते. यातील सिद्धार्थाचा लूक पाहून अनेक तरुणींच्या काळजाचं पाणी पाणी झालं होत. यानंतर आता शिल्पा शेट्टीचा लूक तरुणांच्या जीवाचे हाल करताना दिसतोय. येऊ पोलीस लोग एकदम बाप लोग है भाई..| अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहेत. सध्या या वेब सीरिजबाबत प्रेक्षकांच्या उत्सुकतेला आभाळ पुरेना झाले आहे. पण अद्याप प्रतीक्षा कायम आहे.