Take a fresh look at your lifestyle.

लसीचे 2 डोस घेऊनही अभिनेत्री शिल्पा शिरोडकर कोरोना पॉझिटीव्ह; इंस्टा पोस्ट करून दिली माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अलीकडच्या काळात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटीही या महामारीच्या विळख्यात आले आहेत. करीना कपूर खान, अर्जुन कपूर, रिया कपूरपासून नोरा फतेहीपर्यंत अनेक चित्रपट कलाकारांनी त्यांच्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाची माहिती दिली आहे. आता बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती खुद्द अभिनेत्रीनेच दिली आहे.

शिल्पा शिरोडकरने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे की, तिला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. शिल्पाने सांगितले की,” 4 दिवसांपूर्वीच तिची चाचणी झाली आणि तिचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिने स्वतःला क्वारंटाईन केले आहे आणि सर्व खबरदारी घेत आहे.”

 

शिल्पा शिरोडकर ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिने कोविडची लस घेतली आहे. तिने वर्षाच्या सुरुवातीलाच कोरोनाची लस घेतली होती. मात्र, आता अभिनेत्री स्वतः कोरोनाच्या विळख्यात आली आहे. त्यानंतर तिने इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना कोरोनाचे नियम पाळण्यास सांगितले आहे.

अभिनेत्रीने पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये तिने लिहिले- ‘तुम्ही सर्व सुरक्षित रहा. लस घ्या आणि सर्व नियमांचे पालन करा. आपल्यासाठी काय चांगले आहे हे आपल्या सरकारला माहीत आहे. खूप प्रेम.’ शिल्पाने आंखे, हम आणि खुदा गवाह यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शिल्पा शिरोडकरच्या आधी अर्जुन कपूरने नुकतेच स्वतःला आणि त्याची बहीण अंशुला कपूरला कोरोनाची बाधा झाल्याची बातमी दिली होती. यानंतर रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी हे देखील कोरोना व्हायरसने पॉझिटिव्ह आढळले होते आणि नुकतेच नोरा फतेहीने देखील स्वतःला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती दिली आहे.