Take a fresh look at your lifestyle.

श्रद्धा कपूरने शेअर केला वडील शक्ती कपूरचा जुना फोटो ; लिहिले ‘हॅपी बर्थडे बापू

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा आज वाढदिवस आहे. शक्ती कपुर आज त्यांचा 68 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी शक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्याच दरम्यान शक्ती कपूरची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर शक्ती कपूर यांचा जुना फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बऱ्यापैकी देखणा दिसत आहे. हिरवा शर्ट, चष्मा घातलेला शक्तीचा हा फोटो त्याच्या तरुणपणीचा आहे.

फोटो शेअर करण्याबरोबर श्रद्धाने वडिलांना सांगितले आहे की ते तिच्यासाठी किती खास आहे. फोटोसह श्रद्धाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘हॅपी बर्थडे बापू. माझे सुपरहीरो होण्यासाठी आणि विश्वातील सर्वोत्कृष्ट बाबा होण्यासाठी धन्यवाद.

शक्ती कपूरने बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये नकारात्मक भूमिका निभावून स्वतःची विशेष ओळख निर्माण केली होती. त्याने केवळ चित्रपटांमधूनच नाही तर आपल्या विनोदातूनही प्रेक्षकांना हसवले आहे. शक्ती कपूरने प्रत्येक पात्र चमकदारपणे बजावले आहे.शक्ती कपूर ने जेवड्या नकारात्मक भूमिका लोकांना आवडल्या तेवढच त्यांचा विनोदीपणा देखील लोकांना आवडला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’