Take a fresh look at your lifestyle.

तुम्ही लग्न कधी करणार??, श्रद्धा कपूरने दिले मराठीत उत्तर ; व्हिडिओ होतोय व्हायरल

0

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेता वरून धवन आणि नताशा दलाल यांच्या लग्नानंतर आता बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच आता एका फोटोग्राफरने देखील श्रद्धाला लग्नाच्या प्लॅनविषयी विचारले असता तिने चक्क मराठीमध्ये उत्तर दिले आहे.

श्रद्धा कपूरन नुकताच विमानतळावर दिसली होती. फोटोग्राफर तिचे फोटो काढत होते. दरम्यान एका फोटोग्राफरने तिला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारला आहे. त्यावर श्रद्धाने ‘काय म्हणतोय’ असे मराठीत उत्तर दिले. त्यानंतर तिला हसू येतं.

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर छायाचित्रकार रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती. इतकच नाही तर गेल्या वर्षी ही जोडी लग्न करणार असल्याचे देखील म्हटले जात होते. याविषयी सोशल मीडियावरही चर्चांना चांगलेच उधाण आले होते. मात्र, अद्याप तरी या दोघांनी याविषयी मौन बाळगले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave A Reply

Your email address will not be published.