Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान बिकिनी फोटो मागणाऱ्या ट्रोलरची बोलती केली बंद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची दबंग गर्ल अर्थात आघाडीची अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा खरोखरीच फुल्ल टू दबंग आहे. कारण एखाद्या मुद्द्यावरून सोनाक्षी ट्रोल झालीच आणि ट्रोलिंग चुकीच्या दिशेने जात असेल तर ती सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहतच नाही. आता अलीकडे सुद्धा असाच काहीस झालं आहे. आजकाल सोशल मीडियावर आस्क मी एनीथिंग सेशनचे भलतेच क्रेझ आहे.. मग काय सोनाक्षीनेही आस्क मी एनिथिंग म्हणत चाहत्यांच्या प्रश्नांना बेधडक उत्तर दिली. या सेशन दरम्यान एका चाहत्याने मात्र खर्च केला आणि तिच्याकडे बिकी फोटोंची मागणी केली. यावर सोनाक्षीने असे उत्तर दिले कि त्याची बोलतीच बंद झाली.

सोनाक्षीचा स्वभाव म्हणजे एकदम सिनिअर सिन्हांसारखाच.. अर्थात खामोश.. तिच्या या स्वभावाची खात्री आस्क मी एनिथिंग या सेशन दरम्यान चांगलीच झाली आहे. अलीकडे नको ती मागणी करणा-या एका ट्रोलरचे प्रमाण वाढले आहे. त्याचं झालं असं की, सोनाक्षीने सोशल मीडियावर ‘आस्क मी एनिथिंग’ हे सेशन केलं आणि या सेशनदरम्यान काहींनी तिला ट्रोल करत, नको ते प्रश्नही विचारले. तिने उत्तरं दिली पण एका युजरने या सेशनदरम्यानं तिच्याकडे बिकिनी फोटोंची मागणी केली. मग काय? त्याच्या या मागणीवर सोनाक्षीने इंटरनेटवरचा एक बिकनीचा फोटो उचलला आणि लगेच शेअर केला. असे उत्तर पाहिल्यावर तो युजरही चक्रावला असेल. याशिवाय एका युजरने वजन कमी करण्यासाठी काय खाऊ? असं सोनाक्षीला विचारलं. यावर सोनाक्षी म्हणाली कि, ‘तू ना हवा खा….’. आता अशी उत्तर मिळाल्यावर ट्रोलर्सपण तिला ट्रोल करण्या आधी विचार करतील नाही का..

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. मात्र गेल्यावर्षी ती ह्या ना त्या कारणामुळे सारखीच ट्रोल झाली होती. यानंतर तिने ट्विटर अकाउंट बंद देखील केले. पण आता सोनाली ट्रोल होत नाही तर ट्रोलर्सचीच शाळा घेते. सोनाक्षीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं, तर लवकरच ती डिजिटल डेब्यू करणार आहे. नेटफ्लिक्सच्या ‘बुलबुज तारंग’मधून ती दिसणार आहे. या आधी ती सलमान खानसोबत ‘दबंग ३’मध्ये दिसली होती आणि आता शेवटची ती अजय देवगणसोबत भुज थे प्राईड ऑफ इंडिया या सिनेमात दिसली.

Leave A Reply

Your email address will not be published.