Take a fresh look at your lifestyle.

बॉलिवूडवर पुन्हा पसरली शोककळा; ज्येष्ठ अभिनेत्री श्रीप्रदा यांचे कोरोनामुळे निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोनामुळे मनोरंजन विश्वाला आणखी एक मोठा धक्का लागला आहे. प्रतिभावान अभिनेत्री बॉलिवूड, भोजपुरी आणि साऊथ सिनेसृष्टीतील अनेक चित्रपटांत झळकलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री श्रीप्रदा यांचे बुधवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी येताच साऊथ इंडस्ट्रीसह अगदी भोजपुरी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करीत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सिन्टाचे जनरल सेक्रेटरी अमित बहल यांनी श्रीप्रदा यांचे निधन झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक प्रतिभावान व्यक्तिमत्वांना आपण गमावले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री श्रीप्रदा या मनोरंजनसृष्टीतील एक ज्येष्ठ व प्रतिभावान अभिनेत्री होत्या. त्यांनी दक्षिण आणि हिंदी चित्रपटांत उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. फक्त साऊथ आणि बॉलिवूड नव्हे तर भोजपुरी सिनेसृष्टी देखील आपल्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी गाजविली आहे.

 

श्रीपदा यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांत काम केले आहे. धर्मेन्द्र, विनोद खन्ना आणि गोविंदांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीवर आपली जादू केली होती. श्रीपदा यांनी १९७८ साली आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुराना पुरूष, धर्मसंकट, बेवफा सनम, आजमाइश, आग और चिंगारी, शैतानी इलाका, शोले और तुफान अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले होते. धर्मसंकट या सिनेमात त्या विनोद खन्ना यांच्यासोबत झळकल्या होत्या. १९९३ साली एका टेलिव्हिजन शोमध्येही त्यांनी काम केले होते.