Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सनी लिओनी घेतेय बॉक्सिंगचे धडे ; फोटो शेअर करत दिली माहिती

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडची बेबी डॉल अर्थात अभिनेत्री सनी लिओनीचा हॉट अंदाज तिच्या चाहत्यांना नक्कीच आवडत असतो. सनी सध्या लॉस एंजेलिसमध्ये असून आपला हा विशेष वेळ ती आपल्या फॅमिलीसोबत घालवत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सनी नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते. सनी सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. सध्या ती बॉक्‍सिंग धडे गिरविते आहे आणि ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे.

ट्रेनिंगच्या पहिला दिवसाचा फोटो तिने पोस्ट करून चाहत्यांना माहिती दिली आहे. ट्रेनिंगच्या आधी आणि नंतर माझा चेहरा असाच टमाटरसारखा लाल असतो, हे सगळं सहन करत मी पुन्हा यासाठी तयार आहे, असे तिने कॅप्शन दिले आहे.

सनीने एक पॉर्नस्टार म्हणून तिच्या करियरला सुरुवात केली. ‘जिस्म २’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज सनी लिओनीची गणना बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये केली जाते. ‘बिग बॉसच्या ५ व्या’ सिझनमध्ये सनी लिओनी सहभागी झाली होती. याच कार्यक्रमामुळे ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली आणि तिच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.