Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सनी लिओनीने घेतली नवीन लक्झरी कार ; पहा फोटो

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच कुठल्या ना कोणत्या कारणास्तव सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सनी नेहमी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करतअसते. दरम्यान, सनी लिओनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सनी लिओनीने एक नवीन लक्झरी कार खरेदी केली आहे. त्याच वेळी, आणखी एक लक्झरी कार त्यांच्या आलिशान कार संग्रहात सामील झाली आहे. सनी लेआनीची नवीन कारचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक नवीन लक्झरी कार Maserati खरेदी केली असून सनीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. सनीने पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. या कार ची किंमत 1.35 ते 1.52 कोटी आहे.

फोटो पोस्ट करत सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काल मी या कारला माझ्या घरी आणले. मी जेव्हा जेव्हा गाडी चालवते तेव्हा मला खूप आनंद होतो. सनीच्या चाहत्यांना हे चित्र खूप आवडले आहे. चाहत्यांसह कलाकारही सनीला तिच्या नवीन कारसाठी शुभेच्छा देत आहेत. सनीच्या या फोटोला आतापर्यंत 12 लाखाहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’