Take a fresh look at your lifestyle.

कलाविश्वाला आणखी एक धक्का; ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मालिका आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाच्या जोरावर गेली अनेको वर्षे राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सीकरी यांचे दुःखद निधन झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान त्या ७५ वर्षाच्या होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. गतवर्षी त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीविषयक तक्रारींमध्ये वाढ झाली होती. सुरेखा यांच्या मॅनेजरकडून त्यांच्या निधनाच्या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे.

 

सुरेखा सिकरी यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सुरेखा सिकरी यांनी बधाई हो आणि बालिका वधू सारख्या अनेक एकापेक्षा एक आणि लोकप्रिय चित्रपटांमध्ये अगदी आठवणीत राहतील अश्या भूमिका वठविल्या आहेत. एका माध्यमाशी बोलताना सुरेखा सिकरी यांच्या मॅनेजरने सांगितले कि, “सुरेखा सिकरी यांचे आज सकाळी वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. सलग दुसऱ्यांदा ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक होती. दरम्यान त्या बरेच दिवस आजारी होत्या. सुरेखा सिकरी त्यांच्या शेवटच्या दिवसात आपल्या कुटूंबियांसमवेत होत्या. या कुटुंबाला या दु: खाच्या घटनेत स्वत: साठी या धक्क्यातून सावरण्यासाठी खाजगी वेळ हवा आहे. ओम साई राम.

यूपीमध्ये जन्मलेल्या सुरेखा सिकरी यांचे बालपण अल्मोडा आणि नैनितालमध्ये गेले. त्यांची आपले शालेय शिक्षण अलिगड मुस्लिम विद्यापीठातून पूर्ण केले आहे. यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्या दाखल झाल्या होत्या. सुरेखा यांना १९८९ सालामध्ये संगीत नाटक अकॅडेमी पुरस्कारही मिळाला आहे. सुरेखा यांचे वडील हवाई दलात कार्यरत होते. तर त्यांच्या आई शिक्षिका होत्या. पुढे सुरेखा यांचे लग्न हेमंत रेगे यांच्याशी झाले. त्यांना एक मुलगा देखील आहे. ज्याचे नाव राहुल सिकरी असून तोही एक कलाकार आहे. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांच्या पहिल्या पत्नीशी सख्ख्या बहिणीचे नटे असल्यामुळे सुरेखा सिकरी आणि नासिरुद्दीन शाह यांचे कौटुंबिक संबंध आहेत.

ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिकरी यांनी अनेको चित्रपट आणि हिंदी मालिकांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका निभावल्या आहेत. बालिका वधू या मालिकेतील त्यांची दादीची भूमिका आजही लोकांच्या लक्षात आहे. मालिका विश्वातून अनेको कलाकारांनी सुरेखा सिकरी यांच्या निधनाचे वृत्त समोर येताच त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.