Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री सुष्मीता सेनच्या मुलीचे बॉलीवूड मध्ये पदार्पण ; ‘या’ चित्रपटात करणार काम

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | सध्या बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सचा भरणा पाहायला मिळत आहे.सोनम कपूर, श्रद्धा कपूर, सारा अली खान यासारख्या स्टारकिड्स नी आत्तापर्यंत दमदार अभिनय करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्यातच आता अभिनेत्री सुष्मिता सेनची मुलगी रिनी ही देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याचे म्हटले जात आहे. ती एका चित्रपटात भूमिका साकारणार असल्याचे म्हटले आहे.

या चित्रपटाचे नाव ‘सुट्टाबाजी’ असे असून करोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडानच्या काळावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जाते. लॉकडाउनच्या काळात कुटुंबातील नात्यांवर या चित्रपटाची कथा आधारित असल्याचे म्हटले जाते. या चित्रपटात रिनी एका  बिघडलेल्या मुलीची भूमिका साकरणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CF48qNBga34/?utm_source=ig_web_copy_link

यापूर्वी सुष्मिता सेनने अनेक मुलाखतींमध्ये रिनीला भविष्यात अभिनेत्री होण्याची इच्छा असल्याचे सांगितले आहे. त्यासाठी ती अभिनयाचे धडे घेत असल्याचे सांगितले होते. तसेच रिनीला गाण्याची देखील आवड असल्याचे सुष्मिताने सांगितले होते. त्यामुळे आगामी चित्रपटात ती गाणे गाणार असल्याचे म्हटले जाते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’