Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री स्वरा भास्कर कायदेशीर अडचणीत; हिंदूंच्या भावना दुखावल्याबद्दल गुन्हेगारी तक्रार दाखल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सोशल मीडियावर अतिशय सक्रिय असते. ज्यामुळे देशातील कोणत्याही मुद्द्यांवर ती स्पष्ट व्यक्त होण्यासाठी याचा सर्रास वापर करताना दिसते. कोणत्याही मुद्यांवर बोलताना तिची जीभ आणि आत्मविश्वास कधीच डगमगत नाही. यामुळे अनेकदा सोशल मीडियावर नेटकरी तिचे समर्थन करताना दिसतात. मात्र यावेळी स्वराला आपले मत व्यक्त करणे चांगलेच महागात पडले आहे. तिने केलेले तालिबानी दहशतवाद्यांबद्दलचे ट्विट पाहिल्यानंतर ट्विटरवर ‘#ArrestSwaraBhasker’, ‘#SwaraBhasker’ ट्रेंड होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर एक मोठी बातमी म्हणजे ऍडव्होकेट युक्ती राठी यांनी स्वर भास्कर विरोधात गुन्हेगारी तक्रार दाखल केली आहे.

याबाबत तक्रार दाखल कर्त्या ऍडव्होकेट युक्ती राठी यांनी ट्विट करीत लिहिले आहे कि ,हे ट्विट एक भारतीय आणि एक हिंदू म्हणून माझ्या भावना दुखावत आहे. मी त्याविरोधात फौजदारी तक्रार दाखल केली आहे @ReallySwara ने समुदायांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी आणि माझ्या भावना दुखावल्याबद्दल तिच्यावर कृपया कारवाई करा. यापुढे तिने हे ट्विट उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आदी योगिनाथ, शालभ मणी त्रिपाठी मुख्यमंत्री सूचना सल्लागार, युपी पोलीस, हिंदू इकोसिस्टिम, बीजेपी नेता कपिल मिश्रा याना टॅग केलेले आहे.

सध्या तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल ताब्यात घेतली आहे. या दरम्यान तालिबान्यांचा दहशतवाद आणि क्रूरपणा स्पष्ट दिसून आला असताना, स्वरा भास्करने अफगाणिस्तानच्या सद्यपरिस्थितीबाबत ट्विट केले. यात स्वराने अफगाणिस्तानच्या या स्थितीची थेट भारताशी तुलना केली आहे, ज्यामुळे तिला अटक करा अश्या मागणीने सोशल मीडियावर जोर धरला आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे कि, ‘आम्ही हिंदुत्व दहशतवादाशी ठीक असू शकत नाही आणि तालिबानी दहशतवादामुळे प्रत्येकजण हैराण आणि उद्ध्वस्त झाला आहे. आपण तालिबानच्या दहशतीसह शांत बसू शकत नाही आणि मग हिंदुत्वाच्या दहशतीबद्दल राग येऊ शकतो. आपली मानवी आणि नैतिक मूल्ये दडपलेल्यांच्या ओळखीवर आधारित नसावीत.’

स्वराच्या या एका ट्विटनंतर ट्विटर सोशल मीडिया युजर्सच्या संतापाचा भडका उडाला आहे. दरम्यान एका युजरने लिहिले, ‘स्वरा भास्करला अटक करा, तिने आमच्या भावना दुखावल्या आहेत.’ तर दुसरीकडे, अन्य एका युजरने लिहिले ‘स्वरा भास्करला हिंदुत्वाचा अपमान केल्याबद्दल अटक करा.

हिंदूंनी कधीही कोणतेही दहशतवादी कृत्य केले नाही.’ इतकेच नव्हे तर काही युजर्स स्वराचे अधिकृत ट्विटर खाते निलंबित करा, अशी मागणी करत आहेत. तर, काही लोक स्वराविरुद्ध एफआयआर नोंदवा अशी मागणी करत आहेत.