हॅलो बॉलिवूड ऑनलाईन । राजकीय घडामोडींवर नेहमीच परखड मत व्यक्त करणारी सिनेअभिनेत्री स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधात ती बोलत असते. नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी विरोधातील अनेक मोर्चात स्वरा सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील त्याबद्दलची तिची भूमिका ती मांडत असते. त्यामुळं एका वाहिनीच्या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी स्वराला खास आमंत्रित करण्यात आलं होतं. या दरम्यानं स्वरानं केलेल्या एका विधानामुळं ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे.
टीव्हीवरील एका वाहिनीवर स्वरानं ‘हिंदुस्थान शिखर’ संगम या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये स्वराला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि एनआरसी, एनपीआरसंर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्या सर्व प्रश्नांची स्वरानं उत्तरंही दिली. मात्र एका प्रश्नाचं उत्तर देताना स्वराचा चांगलाच गोंधळ उडाला. या शोच्या निवेदिकेनं याआधी २०१० मध्ये देखील एनपीआरसाठी प्रयत्न झाले होते, तेव्हा आवाज का नाही उठवला असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर स्वरा जरा गोंधळून गेली. यावर उत्तर देताना स्वरा गडबडीत असं बोलून गेली कि,’तेव्हा तर मी केवळ १५ वर्षांची होते’,बस्स अन् नेटकऱ्यांनी तिचा हाच मुद्दा नेमका उचलला. या मुद्द्यावरुणाच स्वराला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
स्वराच्या म्हणण्यानुसार सीएए, एनपीआर आणि एनआरसी हे तीनही कायदे एकमेकांशी संलग्न आहेत, एनआरसी देशभर लागू करण्यात येणार आहे, एनपीआरमुळं मुस्लीम समुदायासह हिंदूंचंही नागरिकत्व धोक्यात येणार आहे.या सर्व मुद्यांवर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकांनी तिला प्रतिप्रश्न केले. एनपीआर मुले कुणाचं नागरिकत्व धोक्यात येणार आहे?, एनआरसी केवळ आसाममध्ये लागू करण्यात आला आहे, तो देशभरात लागू करण्यात आलेला नाही, मग देशातील मुस्लीम समुदायाचं नागरिकत्व धोक्यात कसं येणार? सीएए कायद्याच्या माध्यमातून केवळ पाकिस्तान, बांगलादेश यांतील अल्पसंख्याकानाच भारताचं नागरिकत्व दिले जाणार आहे? यातून भारतातील मुस्लीमांचं नागरिकत्व कसं धोक्यात येणार आहे? तुम्ही एनपीआर, एनआरसीचा ड्राफ्ट वाचला आहे का? या सर्व प्रश्नांवर मात्र स्वरा भास्कर अगदी निरुत्तर झाल्याचं पाहायला मिळाल.
खरं तर स्वराच जन्म वर्ष १९८८ हे आहे. सध्या तिचं वय हे ३१ असून २०१०मध्ये तिचं वय हे १५ वर्ष कसं असेल?? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. यावरून अनेक मिम्स तयार करून नेटकऱ्यांनी स्वराला ट्रोल केले आहे. स्वराच्या गणिताचं ज्ञानही नेटकऱ्यांनी तपासून पाहिलं. स्वराचं हे वाक्य खूपच गाजत असून त्यावरून आता #MathematicianSwara हा हॅशटॅग व्हायरल होऊ पाहतोय.