हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये अभिनेत्री स्वाती देवलने निगेटिव्ह पात्र साकारले आहे. मालिकेतील नेहाची वहिनी म्हणून साकारलेली हि भूमिका प्रेक्षकांना प्रचंड प्रचंड भावली. यामुळे घराघरात नेहाची वहिनी सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र नुकतीच स्वातीविषयी एक अशी बातमी समोर आली आहे जी ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. अभिनेत्री स्वाती देवलवर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली असून याबाबत तिने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहित दिली आहे.
यात तिने लिहिलं आहे कि, ‘नमस्कार मित्रांनो, कालच एक छोटी सर्जरी झाली. आता मी बरी आहे. स्वामींची कृपा आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचे प्रेम यामुळेच हे शक्य झालं. स्वामी दत्त कृपा तर वेळोवेळी मिळते मला पण विशेष म्हणजे या वर्षी जाणत आहे. खूप लोकांचे आशीर्वाद मिळालेत. हे पुण्य असं कामी येतं. मी मनापासून तुमची आभारी आहे. अजून फक्त एक आठवडा काळजी घ्यायची आहे. पणं खरंच आपणच आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. दुर्लक्ष करू नका. वेळच्या वेळी उपचार करायला हवे. आपल्या शरीराला रोजच्या जगण्यात पौष्टिक, सकस आहाराची गरज आहे. पूर्वी जंक फूड म्हणजे आई रोजच्या जेवणाव्यतिरिक्त जे बनवायची ते असायचं. म्हणजे फक्त रविवारी पोहे, उपमा, डोसे, फोडणीची पोळी वगैरे. पण या सर्व गोष्टी घरीच बनवलेल्या असायच्या.’
‘आज लोक घरी जेवण करायचा कंटाळा करतात आणि बाहेरून आणतात. मोठे झालो अतिरिक्त बुद्धी आली की मग वेगवेगळ्या रेस्टॉरंटमधले पदार्थ मित्र मैत्रिणीबरोबर चाखायची सवय लागते आणि मग ती जात नाही. कधीतरी हे ठीक आहे. पण चटकदार खायची जिभेची सवय जाऊच शकत नाही. आपल्या शरीरासाठी स्वयंपाक करण्याचा कंटाळा कसला हो. मी आजही शूटला स्वतः डबा नेते पण मी प्रचंड फुडी असल्यानं विविध रेस्टॉरंटमधले पदार्थ खाऊन ते घरी बनवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिथल्या शेफना भेटून विचारून यायची सवय. त्यामुळेच हे सगळं झालं. बरं जेवणाच्या वेळा नियमीत नाहीत म्हणूनही हे सगळं झालं. कुठे थांबायचं, शरीरचे लाड किती पुरवायचे हे आपल्याला स्वतःला समजयला हवं.’
या पोस्टमध्ये स्वातीने अभिनेत्री रुपाली भोसलेचाही उल्लेख केला आहे. काही दिवसांपूर्वी रुपालीवरही शस्त्रक्रिया झाली होती. याचा उल्लेख करत स्वाती म्हणाली की, ‘काही दिवसांपूर्वी मैत्रीण रुपाली भोसलेची पोस्ट वाचली. ती वाचून धैर्य आलं आणि लगेच निर्णय घेतला. धन्यवाद.’ यासोबत स्वातीने ज्या रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली तिथल्या डॉक्टरांचे, नर्स आणि सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. पोस्टच्या शेवटी स्वातीने तिचा पती आणि संगीतकार तुषार देवलचेही आभार मानले आहेत. तिनं लिहिलंय, ‘तुषार तर सेवेत हजर होता. असा नवरा मिळायला भाग्य लागतं. पण खरंच तुषारनं अगदी पेज बनवून ती भरवण्यापर्यंत, पाय दाबून देणं अगदी सर्व काही केलं. तो माझ्या सेवेत हजर होता.. लव्ह यू तुष्की.’
Discussion about this post