Take a fresh look at your lifestyle.

‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे मी अजूनही अविवाहित – तब्बूचा खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलीवूड अभिनेत्री तब्बू आणि अजय देवगण यांनी आता पर्यंत इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट सिनेमा दिले आहेत. या दोघांनी एकत्र काम केलेले ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दना दन’ सिनेमे बॉक्स ऑफिसवर तुफान चालले. एक काळ असाही होता जेव्हा तब्बूचं नाव अजय देवगणशी जोडलं जात होतं. मात्र अजय देवगणनं काजोलशी लगीनगाठ बांधली आणि तब्बू आजही अविवाहित आहे. पण काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तब्बूनं याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे.

तब्बू आजही अविवाहित आहे, पण याबद्दल ती काहीही बोलणेच नेहमी टाळते. पण ती अविवाहित असण्याला केवळ बॉलिवूडचा सिंघम अभिनेता अजय देवगण जबाबदार असल्याचे तिने काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते. तब्बू आणि अजय देवगण यांची २५ वर्षांपासूनची ओळख आहे. अजय हा तब्बूचा चुलत भाऊ समीर आर्याचा शेजारी होता. त्यामुळे तब्बू आणि अजय यांची अनेक वर्षांपासून खूपच चांगली मैत्री आहे.

तिने या मुलाखतीत सांगितले होते की, अजय आणि समीर हे दोघंही सतत माझ्यावर नजर ठेवून असायचे, जिथे मी जायचे तिथे ते माझा पाठलाग करायचे. या दोघांमुळे इतर मुलांशी बोलण्याचीही भीती वाटायची. जर एखाद्या मुलाने माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर ते दोघंही त्याला मारण्याची धमकी द्यायचे. दोघंही खूप मस्तीखोर होते. आजही मी अविवाहित आहे याला फक्त आणि फक्त अजयच जबाबदार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.