Take a fresh look at your lifestyle.

अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या गाडीला अपघात; ब्रेक फेल झाल्याची प्राथमिक माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीत ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटाच्या माध्यमातून पदार्पण करणारी अभिनेत्री तनुश्री दत्ता हि सोशल मीडियावर फार सक्रिय असते. तिचा स्वतःचा वेगळा चाहता वर्ग असल्यामुळे ती सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करते. तिच्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. यानंतर तिने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत जे फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का लागला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री तनुश्री दत्ता महाकालच्या दर्शनासाठी जात असताना तिच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात तनुश्री बऱ्यापैकी जखमी झाली आहे. याची माहिती अभिनेत्री तनुश्री दत्ताने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ताने तिच्या अधिकृत सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंपैकी काही फोटोंमध्ये तिच्या पायाला झालेली दुखापत स्पष्ट दिसतेय. याचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिने स्वतःच या घटनेबद्दल माहिती दिली आहे. यातील एक फोटो हा अपघातावेळचा आहे. या फोटोमध्ये अपघातादरम्यान तिच्या पायाला झालेल्या जखमा स्पष्ट दिसत आहेत. या संपूर्ण अपघाताच्या घटनेचे वर्णन करताना तनुश्रीने लिहिले कि, ‘आजचा दिवस साहसी होता!! पण शेवटी महाकालाचे दर्शन झाले…मंदिराकडे जाताना विचित्र अपघात झाला…ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात झाला….फक्त काही टाके लागले आहे…जय श्री महाकाल!

तनुश्रीने सोशल मीडियावर हे फोटो शेअर केल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या अपघातात अभिनेत्रीच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र सुदैवाची बाब अशी कि ब्रेक निकामी होऊन झालेल्या या कर अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे चाहत्यांच्या चिंतेला दिला मिळला आहे. तनुश्रीच्या या पोस्टवर तिच्या अनेक चाहत्यांची तिच्याप्रती काळजी व्यक्त केली आहे. तर अनेकांनी कमेंट्समधून तिला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत. इंडस्ट्रीपासून दूर असूनही तनुश्रीच्या मोठा चाहता वर्ग आहे.