Take a fresh look at your lifestyle.

‘सुलतान’ला नकार दिल्याने आदित्य चोप्राने दिली होती धमकी; कंगना धक्कादायक खुलासा

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | बॉलिवूडची क्वीन अर्थात अभिनेत्री कंगना रणौतने निर्माता आदित्य चोप्रावर निशाणा साधला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, कंगनाने आदित्य चोप्रावर आरोप केले आहेत. सलमान खानच्या ‘सुलतान’ या चित्रपटाला नकार दिल्यानंतर आदित्यने मला धमकी दिली, असा धक्कादायक खुलासा तिने केला आहे. सलमानच्या ‘सुलतान’ चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्यासाठी आधी कंगनाला विचारण्यात आलं होतं. मात्र तिने नकार दिल्यानंतर अनुष्का शर्माची वर्णी लागली.

कंगना म्हणाली, “मला सलमान खानच्या सुलतान चित्रपटाची ऑफर मिळाली होती. चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर माझ्याकडे आले . पण मला खानसोबत चित्रपट करायचा नव्हता. याबद्दल नंतर माझी आदित्य चोप्रासोबत भेटसुद्धा झाली. या भेटीदरम्यान मी चित्रपटाला नकार देत माफी मागितली होती. तेव्हा ते काहीच बोलले नाही. पण नंतर जेव्हा मी नकार दिल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांमध्ये झळकली तेव्हा त्यांचा मला मेसेज आला. मला नकार देण्याची तुझी हिंमत कशी झाली, तुझं करिअर उद्ध्वस्त करेन, अशी धमकी ते देऊ लागले होते.

“माध्यमांसमोर येऊन बोलल्याने त्यांचा पारा चढला होता. तुला कुठेच काम मिळणार नाही. तुझं सर्व करिअर संपलं,” असं आदित्य चोप्राने म्हटल्याचं कंगनाने सांगितलं.

Comments are closed.