Take a fresh look at your lifestyle.

नेहा कक्कर पाठोपाठ आता आदित्य नारायणही अडकणार लग्नाच्या बेडीत ; ‘या’ अभिनेत्रीसोबत करणार लग्न

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूड गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) आपली मैत्रीण अभिनेत्री श्वेता अग्रवालसोबत (Shweta Agarwal) लग्नगाठ बांधणार आहे. आदित्यने स्वत: एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतील आदित्यने सांगितले की, ‘मी आता 10 वर्षांच्या नात्याला विवाह बंधनात बांधण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. 

आदित्याने सांगितले, ‘मी श्वेताला ‘शापित’ या चित्रपटाच्या सेटवर भेटलो होतो. आमच्या चांगले बॉन्डिंग झाले आणि हळूहळू ती तिच्या प्रेमात पडलो. सुरुवातीला तिला केवळ मैत्री हवी होती. कारण आम्ही दोघेही वयाने लहान होतो. दोघांनाही करिअरवर लक्ष केंद्रीत करायचे होते. प्रत्येक नात्याप्रमाणेच आमच्या नात्यातही बरेच चढऊतार आलेत. मात्र आमचे नाते अतूट राहिले. येत्या नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये आम्ही लग्न करू शकतो. माझ्या आईवडिलांना श्वेता खूप आवडते.’

आदित्यच्या म्हणण्यानुसार, माध्यमांमध्ये त्याच्या आणि श्वेता यांच्या नात्याविषयी बर्‍याच गोष्टी घडल्या. प्रत्येक नात्यात अडचणी असतात. परंतु, कोणताही मार्ग थांबत नाही. आम्ही तो चांगला पद्धतीने पार केला. आदित्यच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आदित्य नारायण अभिनय आणि गाण्याव्यतिरिक्त रिअॅलिटी शोचे आयोजन करीत आहेत. लोकांनाही त्यांची शैली प्रचंड आवडते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’