Take a fresh look at your lifestyle.

अफगाणिस्तान धार्मिक राज्य आहे आणि..; हिजाब प्रकरणावरील कंगनाच्या पोस्टवर शबाना आझमींचे उत्तर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कर्नाटक राज्यात सुरु असलेले हिजाब प्रकरण मिटता मिटत नाही हे दिसत आहे. पण दुसरीकडे सर्व स्तरांवरून या प्रकरणावर ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्यामुळे हे प्रकरण मिटेल असे वाटत नाही. अनेकांना हिजाब घालणे योग्य वाटत आहे. तर अनेकांना शाळेत गणवेशच घालणे योग्य वाटत आहे. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळतोय. दरम्यान बॉलिवूड इंडस्ट्रीतून अनेकांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात हेमा मालिनी, स्वरा भास्कर, ऋचा चढ्ढा, सोनम कपूर, कंगना रनौत आणि आता शबाना आझमी यासारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. दरम्यान नेहमीच वादग्रस्त मुद्यांवर आपले मत व्यक्त करुन चर्चेत राहणारी कंगना रनौतही हिने ट्विट केल्यानंतर या ट्विटला प्रत्युत्तर म्हणून अभिनेत्री शबाना आझमी यांनी पोस्ट केली आहे.

बॉलिवूडची पंगा गर्ल अभिनेत्री कंगना रनौत हिने हिजाबच्या मुद्यावर आपली प्रतिक्रिया देताना इंस्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिने २ फोटो शेअर केले आहेत आणि यासोबत लिहिले की, जर तुमच्यात हिंमत असेल तर अफगानिस्तानमध्ये बुरखा न घालता फिरुन दाखवा, पिंजऱ्यातून मुक्त होण्याचा प्रयत्न करा. अशा आशयाची कंगनाने इंन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. कंगनाची याच पोस्टवर अभिनेत्री शबाना आझमी यांनी प्रतिक्रिया देणारी पोस्ट लिहीत यावर आपले मत प्रकट केले आहे.

अभिनेत्री शबाना आझमी यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले कि, माझं जर चुकत असेल तर बरोबर करा, अफगाणिस्तान हे एक धार्मिक राज्य आहे आणि जेव्हा मी भारताविषयी बघितलं तर समजलं की, हिंदुस्थान हा धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक देश होता? या त्यांच्या प्रश्नार्थक पोस्टवर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी लिहिले कि, तुम्ही बरोबर बोलत आहात आम्हाला तुमचा मुद्दा बरोबर वाटतोय. शबाना आझमींच्या पोस्टवर आलेल्या प्रतिक्रिया या सगळ्या त्यांच्या समर्थनार्थ असल्याचे दिसत आहे.

शबाना आझमी यांच्याआधी गीतकार जावेद अख्तर यांनीही बुरखा आणि हिजाबच्या मुद्यावर आपले मत मांडले होते. दरम्यान जावेद अख्तर म्हणाले होते कि, “मी कधीच बुरखा आणि हिजाबच्या बाजूने नव्हतो. ते परिधान करण्याला माझा आधीही विरोध होता आणि आजही आहे. पण कर्नाटकात लहान मुलींना ज्या प्रकारे धमकावलं जातंय ते संतापजनक आहे. हा मुद्दा समोर आणून महिलांवर जे गलिच्छ आरोप केले जात आहेत ते चुकीचे आणि निंदनीय आहेत. त्याचं समर्थन होऊ शकत नाही. ते चुकीचंच आहे”.