Take a fresh look at your lifestyle.

हिंसक वागणुकीमुळे बिग बॉस 15’च्या घरातून अफसाना खानची हकालपट्टी; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १५’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेली लोकप्रिय पंजाबी सिंगर अफसाना खान हिची शोमधून हकालपट्टी करण्यात आलीये. अफसानाने कथितरित्या चाकूने स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बिग बॉसने तिला तडकाफडकी घराबाहेर काढल्याचे समोर येत आहे. आल्या दिवसापासून अफसाना खान तिचे आगळे वेगळे हिंसक स्वरूप दाखवताना दिसत आहे. तिची हि वागणूक पाहता अखेर बिग बॉसने तिला कडक शासन दाखवत घराबाहेर काढले आहे.

ई-टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले असून यानुसार अफसानाला शोमध्ये पुन्हा एकदा पॅनिक अटॅक आला. यानंतर वैद्यकीय कारणांमुळे तिला शो बाहेर जावं लागलं. तर काही वृत्तानुसार, व्हीआयपी एक्सेस टास्क हरल्यानंतर अफसानाचा स्वत:वर ताबा सुटला होता. उमर रियाज तिला व्हिआयपी झोनमधून बाद करतो आणि यामुळे अफसाना भडकते. मी सर्वांची टार्गेट आहे. मला सगळे बाहेर काढू इच्छितात, असं म्हणत ती जोरजोरात ओरडू लागते आणि रागारागात किचनमधील चाकू उचलते. तिने चाकू उचललेला पाहून उमर, जय आणि करण लगेच तिच्याकडे धाव घेत तिला थांबवतात. पण अफसाना जोरजोरात किंचाळते.

यादरम्यान अफसाना शमिता शेट्टीसोबतसुद्धा भिडते. त्या दोघींचे जोरदार भांडण होतं आणि या भांडणात अफसानाची हिंसक वागणूक बघून बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना लिव्हिंग एरियात एकत्र यायला सांगतात आणि अफसाना खानला शो बाहेर करण्याची घोषणा करतात. बिग बॉस 15 च्या ताज्या प्रोमोमध्ये अफसाना व्हिआयपी झोन टास्कमधून बाहेर पडल्यानंतर स्वत:वरील ताबा गमावून बसल्याचं दिसत आहे. शिवाय अफसाना किचनमधला चाकू उचलून स्वत:ला मारण्याची धमकी देतानाही दिसतेय आणि घरातील अन्य सदस्य तिच्या हातून चाकू खेचून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आता आज टेलिकास्ट होणा-या एपिसोडमध्ये अफसाना नेमक्या कोणत्या कारणावरून शोबाहेर गेली, ते सर्वानाच कळणार आहे.