Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘… आणि संदीप पाठकने घेतले अरुण काकांचे आशीर्वाद’; 21 वर्षानंतर विठ्ठलानेच जुळवून आणला योग

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sandip Pathak_ArunNalavade
0
SHARES
78
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एखाद्या कलाकारासाठी आपल्या कारकिर्दीची सुरुवात आणि सुरुवातीला लाभलेली साथ अत्यंत महत्वाची असते. याचा प्रत्यय मराठी अभिनेता संदीप पाठक याने शेअर केलेल्या पोस्टमधून येत आहे. ‘श्वास’ या गाजलेल्या कलाकृतीनंतर आता २१ वर्षांनी संदीप पाठक आणि ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे एकत्र काम करणार आहेत आणि यामुळे संदीपने भावनिक होत एक पोस्ट शेअर केली आहे. संदीप पाठकने ‘श्वास’ या चित्रपटातूनसाज त्याच्या सिनेविश्वातील कारकिर्दीची सुरुवात केली होती त्यामुळे हा अनुभव त्याच्यासाठी लाखमोलाचा आहे.

View this post on Instagram

A post shared by Sandeep Pathak (@mesandeeppathak)

सध्या संदीप पाठक आणि अरुण नलावडे हे एकत्र ‘विठ्ठल’ या आगामी मराठी चित्रपटात काम करत आहेत. या चित्रपटाचं शूटिंग सुरु असून या सेटवर २१ वर्षांनी पुन्हा एकदा अरुण नलावडे यांच्यासोबत काम करताना संदीपच्या भावनांचा बांध फुटला आणि तो व्यक्त झालं आहे. अभिनेता संदीप पाठक याने एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर त्याने हि व्हिडीओ पोस्ट शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘सध्या मी “विठ्ठल” या मराठी चित्रपटाचे शुटींग करतोय, मी तीन वर्ष वारी केल्यामुळेच मला विठ्ठल नावाच्या सिनेमात काम मिळाले असं मी मानतो. अजून एक आनंद म्हणजे श्वास चित्रपटानंतर (२१ वर्षानंतर) मला अरूण नलावडे सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. लवकरच हा चित्रपट आपल्या भेटीला येईल….’

View this post on Instagram

A post shared by Sandeep Pathak (@mesandeeppathak)

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय कि, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे अभिनेता संदीप पाठक याला आशीर्वाद देत आहेत. अभिनेते अरुण नलावडे म्हणतात कि, संदीपच्या आयुष्याची सुरुवात मी बघितली होती. आज माझ्या शेजारी विठ्ठलच बसलाय. या सगळ्या योगायोगाच्या गोष्टी आहेत.’ असे म्हणत अरुण यांनी संदीपला आशीर्वाद दिले. दोघांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता संदीप पाठक १० फेब्रुवारी २०२३ रोजी रिलीज होणाऱ्या आगामी मराठी चित्रपट ‘ढिशक्यांव’मध्ये दिसणार आहे. तर ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे सध्या सोनी मराठीवरील ‘प्रतिशोध’ मालिकेत काम करत आहेत. आता श्वास नंतर संदीप पाठक – अरुण नलावडे २१ वर्षांनी त्यांच्या अभिनयाची काय जुगलबंदी करणार, हे लवकरच विठ्ठल सिनेमात पाहायला मिळणार आहे.

Tags: Arun NalawadeInstagram PostSandip PathakUpcoming Marathi MovieViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group