Take a fresh look at your lifestyle.

किंग इज बॅक; आर्यन खान प्रकरणानंतर अखेर शाहरुख इंस्टावर परतला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान गेल्या काही दिवसांपासून चकाचक दुनियेपासून लांब होता. याचे कारण म्हणजे शाहरुखचा मुलगा आर्यन खान मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात सापडला होता. या प्रकरणामुळे बॉलिवूडसह राजकीय वर्तुळातदेखील चांगलीच खळबळ उडाली होती. यानंतर शाहरुखला मानहानी आणि टीकांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे काही काळ शाहरुखने मीडिया, सोशल हॅन्डल्स सगळ्यापासून एक अंतर राखले होते. यानंतर अखेर आज ४ महिन्यानंतर तो सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे दिसून आले आहे.

शाहरुखने नुकताच पत्नी गौरी खानसोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. शाहरुखची हि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सगळीकडे ही प्रमोशनल पोस्ट असली तरी व्हायरल होण्याचे कारण म्हणजे शाहरुखचे कम बॅक. शाहरूख एलजी टीव्हीचा ब्रँड अम्बेसिटर असल्यामुळे त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये LG च्या टीव्हीचं प्रमोशन करण्यात आलं आहे. मात्र तब्बल ४ महिन्यांनंतर आपल्या लाडक्या अभिनेत्याची नवी पोस्ट पहायला मिळाली म्हणून चाहते भारी खुश झाले आहेत. या पोस्टवर चाहत्यांनी किंग इज बॅक अशा कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तर अनेकांनी वेलकम बॅक अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एनसीबीने आर्यन खानला अटक केल्यानंतर संपूर्ण देशभरात हे प्रकरण चांगलेच गाजले. दरम्यान अभिनेता शाहरूख खान आपली सगळी काम, प्रतिष्ठा सगळं काही बाजूला ठेवून फक्त आणि फक्त आपल्या लेकाला वाचवण्याचा प्रयत्न करत होता. यानंतर आर्यन बराच काळ NCB च्या कोठडीत होता.

अखेर त्याला न्यायालयाने जमीन दिल्यानंतर त्याची कोठडी सुटली पण प्रकरण अद्याप चालू आहे. अशातच शाहरूखच्या अनेक फिल्मस देखील थांबवण्यात आल्या होता. त्यावेळी शाहरूख सोशल मीडियापासून सोशल लाईफपर्यंत सगळ्याचा त्याग केला होता. पण आता तो पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाल्यामुळे त्याचे चाहतेदेखील खुश आहेत.