हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । फिल्ममेकर अली अब्बास जफर यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते की तो १९८७ मध्ये आलेल्या अनिल कपूरचा सुपरहिट फिल्म मिस्टर इंडियाचा रीमेक करणार आहे. मिस्टर इंडियाचे दिग्दर्शन शेखर कपूर आणि यांनी केले होते तर अनिल कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक बनवतानाबद्दल अनिल कपूरची मुलगी सोनम कपूर हिने खूप सुनावले आहे. सोनमने यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत टीका केली आहे.
सोनमने लिहिले- बरेच लोक मला मिस्टर इंडियाच्या रीमेकबद्दल विचारत आहेत. खरं सांगायचं तर माझ्या वडिलांनाही माहिती नव्हती की या चित्रपटाचा रिमेक बनवला जात आहे, सोशल मीडियावर अली अब्बास जफरच्या यांच्या ट्विटनंतरच आम्हाला कळलं. जर ते खरे असेल तर ते अगदी अपमानकारक आहे.ज्या दोन व्यक्तींनी हा चित्रपट तयार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती त्या माझ्या वडिलांना आणि शेखर काकांना विचारण्याची गरज कोणालाही भासली नाही, हे खूप वाईट आहे कारण हा चित्रपट प्रेमाने व कठोर परिश्रमांनी बनलेला आहे. हा माझ्या वडिलांच्या भावनांशी संबंधित असलेला चित्रपट आहे.सोनमने पुढे लिहिले- मला आशा आहे की एखाद्याच्या कार्याबद्दल आणि योगदानाबद्दलचा आदर अजूनही आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा असावा जितका कि बॉक्स ऑफिसवर येणाऱ्या शनिवार व रविवार बाबतचा आहे.
फिल्ममेकर शेखर कपूर यांनीही मिस्टर इंडियाच्या रिमेकवर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले – माझ्याबरोबर मिस्टर इंडिया २ तयार करण्यासंदर्भात आणि त्यासंबंधी मार्गदर्शन करण्याची आवश्यकताहि कोणाला समजली नाही. मला वाटते की ते फक्त बॉक्स ऑफिस कलेक्शनसाठी नाव वापरत आहे. ज्यासाठी ते मूळ निर्मात्याला विचारल्याशिवाय कथा आणि पात्रांचा वापर करू पाहत आहे.या आठवड्याच्या सुरुवातीलाच अली अब्बास जफर यांनी ट्विट केले की ते मिस्टर इंडिया ट्रायलॉजी तयार करणार आहेत.मि. इंडिया हे आइकॉनिक पात्र पुन्हा साकारणे ही मोठी जबाबदारी आहे. आत्ता आम्ही पटकथेवर काम करीत आहोत, कोणत्याही अभिनेत्याचा सध्यातरी विचार झालेला नाही. एकदा स्क्रिप्टचा पहिला मसुदा तयार झाल्यानंतर, त्यानंतरच कास्टिंग सुरू होईल.