Take a fresh look at your lifestyle.

‘असे 100 सलमान गल्ली झाडायला ठेवेन’; बिग बॉस हिंदीमधून बाहेर पडताच बिचुकलेचा थयथयाट

0

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस हिंदीचा १५’वा सीजन सध्या कमाल चालू आहे. एकीकडे सगळे स्पर्धक जिंकण्याच्या प्रयत्नांत असताना दुसरीकडे टास्क कठीण होत चालले आहेत. हे सगळं एका बाजूला आणि अभिजित बिचुकले हे प्रकरण एका बाजूला. खरतर बिग बॉसची शान वाढवण्यासाठी बिचुकलेला बिग बॉसच्या घरात बोलावले गेले. पण पुढे बिचुकलेचं वर्तन पाहून स्पर्धक आणि अगदी शोचा होस्ट सलमान खान सगळ्यांची तार सटकली. प्रत्येक विकेंडला काही ना काही वाद, राडे होणार का? तर होणारच. यानंतर आता बिग बॉसच्या घरातून बिचुकलेची चक्क हकालपट्टी झाली आहे. मग काय बिचुकले शांत थोडीच बसणार? शोच्या होस्टवर अशी काही चिखलफेक त्याने सुरु केली आहे कि काही बोलायचं कामच नाही.

आपल्या स्टाईल आणि रोखठोक विधानाने सतत प्रकाश झोतात असलेला बिग बॉस १५ चा एक्स स्पर्धक अभिजित बिचुकले बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर थेट शोच्या होस्टवर टीका करताना दिसत आहे. अभिनेता सलमान खान हा गेल्या अनेक सिजनपासून बिग बॉसचे सूत्रसंचालन करत आहे.

त्यात सलमान खान बॉलिवूड इंडस्ट्रीतील अत्यंत नावाजलेला आणि आघाडीचा अभिनेता आहे. त्यामुळे सलमानवर टीका करणे कदाचित त्याला महागात पडू शकते. दरम्यान, सलमान खान अजून अंड्यात आहे त्याने कोणाशी पंगा घेतला हे त्याला माहित नाही असा इशारा बिचुकलेने दिला आहे. याशिवाय मी लवकरच पत्रकार परिषद घेईन आणि त्याला दाखवून देईन. मी सगळी पोलखोल करणार आहे. असे बिचुकलेने सांगितले आहे.

दरम्यान माध्यमांशी बोलताना बिचुकलेने सांगितले कि, सलमान खान अजून अंड्यात आहे अजून अंड्याबाहेर यायचं आहे. त्याला कळेल अभिजीत बिचुकले कोण आहे ते आणि कोणाशी पंगा घेतोय. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साताऱ्यातील गादीचा वैचारिक वारस आहे. शाहू, फुले, आंबेडकांना मानणारा मी आहे. असे १०० सलमान मी गल्ली झाडायला दारात उभं करेन,” असं अभिजीत बिचुकले म्हणाला.

सलमान खान स्वत: ला काय समजतो? त्याला लवकरच दाखवून देईल की मी काय आहे. सलमान स्वतःला भाई समजतो पण त्यानेही लक्षात ठेवावं मी दादा आहे’. एकदा बिग बॉसचा ग्रँड फिनाले झाला की पत्रकार परिषद घेऊन मी बिग बॉसच्या घरात काय चालतं याचा खुलासा करेन’.