हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १६च्या घरात तीन आठवड्यांपूर्वी दोन वाईल्ड कार्ड एंट्री झाल्या. ज्यामध्ये याच सिजनमधून एव्हीक्ट आलेली श्रीजिता डे आणि नवा स्पर्धक विकास मानकताला एंटर झाला. यानंतर तिसऱ्या आठवड्यात विकास नॉमिनेट झाला आणि एलिमिनेटसुद्धा.
Biggboss 16 new promo#VikasManaktala hue #BB16 se eliminate kya aap khush hn unke elimination se??
Like ❤️__ YES
Retweet __ NO#biggboss #MCStan #saundarya #archna #AbduRozik #ShivThakre #MCStanIsTheBoss #Sajid #ShalinBhanot #nimrit #SumbuITouqeerKhan #PriyankaChaharChoudhary pic.twitter.com/KqGs4gJ8ck— Zamzam pasha (@zamzampasha) December 31, 2022
नॉमिनेशन वीकमध्ये विकासने अर्चना, सुंबुल यांच्यासोबत राडा घातला. अर्चनासोबत झालेल्या भांडणात त्याने जातीवाचक आक्षेपार्ह विधान वापरल्यामुळे शो मेकर्सला मोठा फटका बसला. अखेर या आठवड्यात विकासाला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर बिग बॉसच्या बिग बझ सत्रामध्ये कृष्णा अभिषेक आणि कश्मिरा शाह यांनी घेतलेल्या मुलाखतीत विकासने घरातील काही स्पर्धकांवर असलेला राग व्यक्त केला आहे.
Casteism is the Harsh reality of India, inhumanity continues…
"I do not talk to small and lower caste people" – Vikas Manaktala
"Tomorrow morning I will purify it with Ganga water" – Shaleen Bhanot
Casteist comment on Archana Gautam in Bigg Boss. pic.twitter.com/O9460v4acM
— The Dalit Voice (@ambedkariteIND) December 31, 2022
या मुलाखतीत विकास मानकताला बोलताना म्हणाला कि, ‘घरात ग्रुप तयार झाले आहेत आणि त्या लोकांनी मला त्यांच्यात मिसळण्याची संधीही दिली नाही. मला वाटते की मी चांगली कामगिरी करू शकलो असतो, पण मला संधी मिळाली नाही.
Vikas Manaktala's Interview afer Eviction #BB16
Like❤️ Retweet🔗#BiggBoss16 #PriyankaChaharChoudhary #BB16 #PriyankaPaltan #SumbulTouqeerKhan #ShivThakare #PriyAnkit #PriyankaIsTheBoss #SumbulSquad pic.twitter.com/hdV09K6hlP
— Bigg Boss 16 live (@Biggboss16live) December 31, 2022
याशिवाय अर्चना गौतमबद्दल बोलताना त्याने सांगितले कि, ‘अर्चनाच्या असभ्यपणाकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. अनेकवेळा तिला फटकारले जाते. पण ज्या पद्धतीने तिला फटकारले पाहिजे तसे केले जात नाही. मनोरंजन करणे, योग्य मुद्द्यांवर लढणे या खेळात सर्व काही ठीक आहे, परंतु लोकांच्या भावनांचा फायदा घेणे चुकीचे आहे’.
Vikas who just Got Evicted from #BB16 House. He Giving Negative Statement against #ShivThakare . vikas We appreciate if U have taken Shiv has a Competition . but What u are now speaking about Shiv is Just jealous.u are playing Double Standard Game. Be Sporting #VikasManaktala pic.twitter.com/37xUbM8Q3g
— jB VIDEOS (@jbvideos05) January 1, 2023
तसेच विकासने बिग बॉसच्या खेळात पुन्हा सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे. सोबतच त्याने या घरातील सदस्य अर्चना गौतम आणि शिव ठाकरे यांना पुन्हा कधीही भेटायची इच्छा नाही असे स्पष्ट सांगितले आहे.
#VikasManaktala must be like ander se try kiya abhi baharase #ShivThakre𓃵 ki game kharab kar dunga…le lo le lo mera interview le lo…will come to spit venom.. #BiggBoss16
— Spider (@ItsyBitsySpid11) January 1, 2023
बिग बॉसच्या घरात एंटर केल्यापासून विकासने शिव ठाकरेला टार्गेट केले कि काय असे वाटत होते. वारंवार शिव बद्दल पाठून बोलणे आणि मराठी बिग बॉस चे नाव काढून त्याला प्रवोक करणे याशिवाय विकासाने घरात दुसरे काहीही केले नाही असे अनेक प्रेक्षकांचे म्हणणे आहे.
I don't trust #VikasManaktala, Puri bata batani chhaiye thi. here is what #ShivThakare was explaining pic.twitter.com/ClySrBObBP
— amit (@AmitOffline) December 25, 2022
शिव ठाकरे बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता चीटिंग करून झाला आहे, असे तो वारंवार बोलताना दिसला. घडून गेलेल्या घटनेचा अर्धा मुर्धा भाग प्रेक्षकांना सांगून शिवची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न विकासने केल्याचेही अनेकांनी म्हटले आहे. शिवाय बरं झालं गेला.. अशीही प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली आहे.
Discussion about this post