Take a fresh look at your lifestyle.

FIR नंतर गेहना वसिष्ठ म्हणते, “घाण पसरविणारे सर्वच विक्टिम ठरले आहेत”

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यात पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography Case) FIR दाखल झाल्यानंतर गेहाना वशिष्ठचे स्टेटमेंट समोर आले आहे. एका व्हिडिओद्वारे तिने सांगितले की,”मी राज कुंद्राच्या सपोर्टमध्ये बोलत आहे, त्यामुळे माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मला मुद्दाम गुंतवले गेले आहे. माझे नाव मुद्दाम या FIR मध्ये घेतले जात आहे. गुन्हे शाखेने मला अटक केली तेव्हा 5 महिने हे पीडित लोकं कुठे होते? त्यावेळी ते का समोर आले नाही?

गेहना पुढे म्हणाली की,”जी लोकं घाण पसरवत आहेत, ते सर्व विक्टिम बनले आहेत, ते कोण आहेत याचा तपासही केला जात नाही कि त्यांचे पूर्वीचे कामही पाहिले जात नाही, फक्त तीच लोकं असे म्हणत आहेत की, राज कुंद्राने त्यांना एडल्ट इंडस्ट्रीमध्ये आणले, राज कुंद्राने त्यांच्याशी चुकीचे वर्तवणूक केली, गेहनाने चुकीचे केले… आणि FIR मध्ये तेच आरोप पुरावा म्हणून विचारात घेण्यात येत आहे, पण जी लोकं खरोखरच झगडत आहेत ते प्रयत्न करीत आहेत की पुरावे समोरुन दिले जावेत… ते लोकांचे कॉन्टॅक्ट नंबर्स घेत आहेत आणि त्यांच्याविरोधातच FIR नोंदविण्यात येत आहेत.”

ती म्हणाली,”मी तुम्हला खरे काय आहे ते सांगते, ज्या दिवशी मला अटक करण्यात आली त्याच दिवशी ती लोकं माझ्या घरात घुसले होते. ज्यावेळी त्यांनी मला घरातच बंद केले होते होते त्यावेळीच मी त्यांना सर्व हिरोइन्स, प्रोडक्शन वाले आणि लोकेशन सगळ्यांचे नंबर दिले. शक्य असल्यास मी स्वत: च्या हातांनी लिहून दिलेला कागद तपासा किंवा कोणालाही विचारा, आम्ही कोणावरही जबरदस्ती केली नाही. आता हीच लोकं त्या मुलींना फोन करून सांगत आहेत आणि म्हणत आहेत की तुम्ही गेहनाविरोधात गुन्हा दाखल करावा, तुम्ही राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल करावा, मग त्यांच्यातील काही जण तयार होत आहेत आणि जे तयार होत नाहीत त्यांना धमकी देण्यात आली आहे तुम्हाला आरोपी बनविण्यात येईल. एकतर व्हिक्टीम बना नाही तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ.”

गेहना पुढे म्हणाली कि,”म्हणून शेवटी मी राज कुंद्राला सपोर्ट करत आहे, मी सर्व सत्य जगासमोर आणत आहे, मी जगाने संपूर्ण सत्य जाणून घ्यावे. माझे तोंड काही तरी करून बंद करावे आणि मला माध्यमांशी संवाद साधू न देणे हा त्यांचा प्रयत्न आहे. मी लोकांना सत्य सांगू नये, येथे लोकशाही नाही तर फक्त हुकूमशाही चालू आहे, याच कारणास्तव माझ्याविरोधात FIR दाखल झाला आहे, ज्यामुळे मला उचलून आत टाकता येईल आणि मी कोणाशीही काहीही बोलू शकणार नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.