Take a fresh look at your lifestyle.

कंगणा नंतर बॉलीवूड मधील ‘या’ व्यक्तीला बीएमसीची नोटीस

हॅलो बॉलीवूड ऑनलाईन | नुकतंच मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगना राणावतच्या ऑफिसवर अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई केली आहे. त्यातच आता बॉलिवूडचा फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा मुंबई महापालिकेच्या रडारवर आहे. आपली रहिवासी जागा बेकायदेशीरपणे व्यावसायिक मालमत्तेत रुपांतरित केल्याबद्दल बीएमसीने मल्होत्राला नोटीस बजावली आहे.

पाली हिल भागात कंगनाच्या कार्यालयापासून काही अंतरावर असलेल्या मनिष मल्होत्राच्या बंगल्यातील बांधकामांवर महापालिकेने आक्षेप नोंदवला आहे. मनिषला ‘कारणे दाखवा’ नोटिस दिली असून त्याला उत्तर देण्यासाठी सात दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. मनीषच्या बंगल्याबाहेर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

व्यावसायिक वापरासाठी बीएमसीची परवानगी आवश्यक असते आणि त्यासाठी काही रक्कम भरणेही अनिवार्य असते, परंतु मनिष मल्होत्राने ना बीएमसीकडून कोणती परवानगी घेतली, ना कुठलेही पैसे जमा केले.

मनिष मल्होत्रा बॉलिवूड, हॉलिवूड आणि टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर आहे. मनिषने 1990 पासून फॅशन डिझायनर म्हणून करिअरला सुरुवात केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’