Take a fresh look at your lifestyle.

कार्तिक आर्यननंतर करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मध्ये दिसणार विकी कौशल का मग राजकुमार राव?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। धर्मा प्रोडक्शनचा आगामी चित्रपट दोस्ताना २ या बाबत सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. या चित्रपटातील मुख्य नायकाची भूमिका अभिनेता कार्तिक आर्यन करणार होता. मात्र करण जोहर आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या आपसातील मतभेदांमुळे कार्तिकला ह्या संधीस मुकावे लागले. दरम्यान या चित्रपटाचे २० दिवसांचे शूटिंग देखील पार पडले होते. मात्र अचानक कार्तिकची एक्झिट झाल्यानांतर हि भूमिका कोण साकारणार याबाबत जोरदार चर्चा रंगली होती. आता अशी माहिती समोर येत आहे कि, करणने जास्त वेळ न घालवता नव्या चेहऱ्याचा शोध घेतला आहे, अशी माहिती मिळत आहे. ‘दोस्ताना 2’ या चित्रपटासाठी विकी कौशल आणि राजकुमार राव यांच्या नावांचा विचार होत आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, विकी कौशलची या सिनेमात एन्ट्री होऊ शकते आणि विकीसोबत चर्चा निष्फळ ठरली तर राजकुमार रावची हजेरी लागू शकते. विकीचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे लवकरच तो या सिनेमाची शूटिंग सुरु करु शकतो. काही दिवसांपूर्वी तो ‘मिस्टर लेले’ या चित्रपटाचे शूटिंग करत होता. याशिवाय तो आणखी २ चित्रपटांसाठी काम करीत आहे. आता करण जोहरच्या ‘दोस्ताना २’मधून कार्तिक आऊट तर कोणता अभिनेता इन होतोय हे फक्त मेकर्सचं सांगू शकतात.

कोरोनामुळॆ दोस्ताना २ चे शूटिंग गतवर्षी करता आले नाही. मात्र यावर्षी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करीत शूटिंग करण्याची परवानगी मिळाली असता, शूटिंग सुरु करण्यात आले. दरम्यान कार्तिकला चित्रपटाच्या कथानकात त्रुटी जाणवू लागल्या. यामूळे स्क्रिप्टमध्ये काही बदल करावे अशी त्याची मागणी होती. मात्र त्याचे हे वागणे करणला न पटल्यामुळे त्यांच्यात मतभेद झाले आणि कार्तिकची थेट हकालपट्टी करण्यात आली. आता या चित्रपटाबाबत रंगत असलेल्या चर्चेत विकी कौशल आणि राजकुमार राव हि दोन्ही नावे प्रामुख्याने उचलली जात आहेत. आता कार्तिकची जागा नक्की कोणाला मिळतेय हे पाहणे रंजक असणार आहे.