Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘लव्ह आज कल’ नंतर ‘आशिकी 3’मध्ये कार्तिक- सारा पुन्हा एकत्र दिसणार..?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 25, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Aashiqui 3
0
SHARES
33
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा अलीकडेच ‘शहजादा’ हा प्रदर्शित झाला. हा चित्रपट दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या ‘अलावैकुंठपुरुमुलू’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. असे असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही कमाल करू शकला नाही. स्पष्ट म्हणायचं तर ‘शहजादा’ सपशेल दणदणीत आपटला. मात्र इथेच कार्तिकचं नशीब थांबणार नाहीये. कारण अनुराग बासूच्या ‘आशिकी ३’ मध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटातील मुख्य फिमेल व्यक्तिरेखेचा शोध लवकर संपायला हवा. दरम्यान अभिनेत्री सारा अली खान या चित्रपटात कार्तिकसोबत रोमान्स करताना दिसणार असल्याच्या चर्चा वेग घेताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

सगळ्यात आधी १९९० साली आलेला आशिकी आणि त्यानंतर २०१३ साली आलेला आशिकी २ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिस दणाणून सोडला. प्रेक्षक आणि समीक्षक या चित्रपटांच्या प्रेमात पडले. यानंतर आता आगामी आशिकी ३ कडून खूप अपेक्षा असताना हा चित्रपट एक स्टॅण्ड अलोन सिक्वेल असेल, असे बोलले जात आहे. तसेच अन्य चर्चांनुसार या चित्रपटात लीडिंग लेडी म्हणून अभिनेत्री सारा अली खान कार्तिक आर्यन सोबत रोमँटिक केमिस्ट्री दाखवेल. या आधी सारा आणि कार्तिक यांनी २०२० मध्ये आलेल्या ‘लव्ह आज कल’ मध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी पसंती दिली होती.

View this post on Instagram

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

एका माध्यमाने दिलेल्या बातमीनुसार, सारा अली खानला आशिकी ३ या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी संपर्क साधण्यात आला आहे. त्यामूळे जर सारा या चित्रपटासाठी सहमत असेल तर, इम्तियाज अलीच्या ‘लव आज कल’नंतर सारा आणि कार्तिक ‘आशिकी ३’ च्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर दुसऱ्यांदा एकत्र झळकतील. रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या तिसऱ्या लीडसाठी आणखी एका अभिनेत्रीचा शोध सुरू असल्याचे बोलले जात आहे.

View this post on Instagram

A post shared by ˏ 𓏧 𓏲𝕭𝖗𝖔𝖐𝖊𝖓💔 (@74__xxh_)

आशिकी चित्रपटात १९९० साली अभिनेता राहुल रॉय आणि अभिनेत्री अनु अग्रवाल यांनी प्रेमाची एक वेगळीच व्याख्या शिकवली. यानंतर ‘आशिकी २’च्या माध्यमातून २०१३ साली अभिनेता आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री श्रद्धा कपूर यांनी आपला दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेमी युगलांना प्रेम करायला शिकवले. यांनतर आता आशिकी ३ काय घेऊन येणार हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच आहे.

Tags: Aashiqui 3Instagram PostKartik aaryanSara Ali KhanViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group