Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या लाटेत मालिका विश्वाची परफड; महाराष्ट्रानंतर गोव्यातही शूटिंगला बंदी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना महामारीची दुसरी लाट हाहाकार माजवतेय. दरम्यान रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसतेय. महाराष्ट्रानंतर आत्ता गोव्यातसुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसतेय. यामुळे गोवा सरकारनेसुद्धा लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. परिणामी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टींवर बंदी आली आहे. त्यामुळेच गोव्यातील शुटींगवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट हि आधीहून अधिक भयंकर आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. परिणामी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कठोर निर्बंधांसहित लोकडाऊन लावल्याने राज्यातील शुटिंगवर तात्काळ बंदी आणण्यात आली होती. त्यामुळे सर्व कलाकार व इतर क्रू टीमसह मालिकांचे चित्रीकरण परराज्यात करण्याचा धाडसी निर्णय निर्मात्यांनी घेतला. शुटींगसाठी संपूर्ण टीमचे बस्तान लागलीच परराज्यात हलविण्यात आले. मुख्यत्वे शुटिंगसाठी गोवा या राज्याची निवड करण्यात आली व शूटिंग सुरु केले. मात्र सद्यपरिस्थिती पाहता गोव्यात सुद्धा रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी शुटींगसाठी विरोध दर्शविला आहे.

मुंबईत लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक मालिकांचे सेट तात्काळ हलविण्यात आले. यात हिंदी मालिकांसह अनेक मराठी मालिकांचाही समावेश होता. हिंदी मालिकांपैकी कुम कुम भाग्य, गूम है किसीके प्यार में, ये है चाहते, कुंडली भाग्य, कुर्बान हुआ, तुझसे है राबता आणि अपना टाइम भी आयेगा अश्या मालिकांचे चित्रीकरण गोव्यातील विविध लोकेशन्सवर केले जात होते. तर मराठी मालिकांपैकी सूर नवा ध्यास नवा, रंग माझा वेगळा, तू सौभाग्यवती हो, पाहिले ना मी तुला, अग्गंबाई सूनबाई, सुख म्हणजे नक्की काय असतं अश्या लोकप्रिय मालिकांचे चित्रीकरण गोव्यात विविध ठिकाणी सुरु होत. सध्या या मालिका रंजक वळणावर असून त्यांचे चित्रीकरण बंद झाल्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडणार हे नक्की..!

दरम्यान गोव्यातील मडगाव येथे ‘सूर नवा ध्यास नवा’ या मराठी सिंगिंग शोचे शुटींग सुरु असताना गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष आणि फातोर्डाचे माजी आमदार विजय सरदेसाई यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांनी अचानक या शोच्या सेटवर प्रवेश केला. तेथे बऱ्याच लोकांनी मास्क परिधान केला नसल्याचे आढळून आले. त्याचबरोबर सेटवर सोशल डीस्टन्सिंग नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सेटवरची दृश्ये त्यांनी कॅमेरातसुद्धा घेतली आहेत. हा व्हिडीओ त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर सुद्धा शेयर केला आहे.

यावेळी सेटवर सर्व स्पर्धकांसोबत परीक्षक आणि गायक अवधूत गुप्ते सुद्धा उपस्थित होते. अवधूत गुप्ते यांनी सुद्धा विजय सरदेसाई यांना समजवण्याचा अतोनात प्रयत्न केला. आम्ही सर्वजण कोरोना चाचणी करून आल्याचे देखील त्यांनी सांगितले. मात्र तरीसुद्धा विजय सरदेसाई काहीच ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेवटी या शोचे शुटींग थांबविण्यात आले आहे. तसेच गोव्यातील स्थानिक नागरिकांनी देखील शुटींगवर बंदी आणून कडक निर्बंध लावण्याची मागणी सरकारकडे केली आहे.