Take a fresh look at your lifestyle.

मी त्याचा फोन का नाही उचलला..? मामाच्या निधनानंतर पुष्करने व्यक्त होत शेअर केला भावुक व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जगभरात कोरोना महामारीमुळे दररोज अनेको लोक आपला जीव गमावत आहेत. हे मृत्यूचे तांडव थांबता थांबेना झाले आहे. डोळ्यांनाही न दिसणा-या कोरोना व्हायरसने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकजण आपल्या प्रियजनांच्या सहवासाला मुकले आहेत तर काहींनी त्यांना कायमचे गमावले आहे. नुकतेच अभिनेता पुष्कर जोग यानेही आपल्या मामाला गमावले आहे. कोरोनामुळे त्यांचे निधन झाले आहे. मामाच्या निधनानंतर पुष्करने एक भावुक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी पुष्करला अश्रू आवरता आले नाहीत. त्याचा कॉल मी का नाही उचलला? असं म्हणताना त्याचे डोळे अश्रूंनी तरळले होते.

या व्हिडिओत पुष्कर म्हणाला, पाडव्याच्या दिवशी माझा मामा माझ्याशी बोलला होता. २१ एप्रिलला सकाळी ८ वाजता त्याचा मला परत फोन आला. मला लवकर उठायची सवय नाही. त्यामुळे मी त्याचा फोन उचलू शकलो नाही. कॉल बॅक करणेही जमले नाही. दुस-याच दिवशी माझा गोव्याचा सतीश मामा गेल्याचे मला कळले. खूप वाईट वाटले. मी त्याचा फोन का नाही उचलला? आपण अनेकदा नातेवाईकांचा फोन घेणे टाळतो, कधी तो चुकतो. पण आता असे नका करू. त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा. हल्ली कोरोनामुळे आपली माणसं आपल्याला सोडून चालली आहेत. तेव्हा मिस्ड कॉल होऊ देऊ नका. सगळ्यांशी चांगलं वागा, प्रेमाने बोला…, असे म्हणताना पुष्करला भरून आले.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही मामाचा कॉल का घेतला नाही? याबद्दलची खंत पुष्करने व्यक्त केली आहे. त्यावेळेस त्याचा मिस्ड कॉल माझे मन अजूनही खात आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे, कृपा करून एकमेकांच्या संपर्कात राहा़ लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांशी संपर्क होत नाहीये. हे योग्य नाही. काळ कठीण आहे. तेव्हा सगळे हेवेदावे, रूसवे फुगवे विसून आपल्या जीवाभावाच्या लोकांच्या संपर्कात राहा. कॉल मॅसेज तर कधीच मिस करू नका, असे त्याने लिहिले आहे. सोबतच कृपा करून रूसवे-फुगवे दूर ठेवा, हेवेदावे, वैचारिक मतभेद सर्व काही बाजूला ठेवून जीवाभावाच्या माणसांना जपा. त्यांच्याशी बोला, अशी कळकळीची विनंती त्याने हा व्हिडीओ शेअर करताना केली.