हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अगदी काहीच दिवसांपूर्वी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले होते. याबद्दल खुद्द त्यानेच माहिती दिली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो उपचार घेण्यासाठी त्वरित रुग्णालयात दाखल झाला होता. यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. त्या सर्व चाहत्यांसाठी एक आनंदाची आहे. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षय कुमारची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितले आहे.
एका कार्टूनचा फोटो शेअर करत ट्विंकलने लिहिले आहे की, निरोगी आणि सुरक्षित… पुन्हा त्याला माझ्याभोवती बघून आनंद झाला. ‘ यासह, तिने #alliswell चा टॅग देखील दिला आहे. ही पोस्ट पाहन अनेकांनी देवाचे आभार मानले आहेत तर अक्षयच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाही आहे. काहींनी तर कमेंट करीत लिहिले आहे की – ‘ग्रेट न्यूज’.
कोरोनाची लागण होण्यापूर्वी अक्षय कुमार रामसेतू या चित्रपटाचे शूटिंग करत होता. याच दरम्यान त्याची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. अक्षय शिवाय ‘राम सेतू’ चित्रपटाच्या सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची चिंताजनक माहिती समोर आली होती. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले होते.
Discussion about this post