Take a fresh look at your lifestyle.

‘पद्मावत’ नंतर शाहिद कपूर लवकरच साकारणार एक पौराणिक भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। चॉकलेट बॉय ते हॅण्डसम हंक असा झळकणारा शाहिद कपूर आपल्या विविध भूमिकांनी रुपेरी पडदा नेहमीच गाजवतोय. शाहिदने प्रत्येक भूमिकेस नेहमीच योग्य न्याय मिळवून दिला आहे. ‘पद्मावत’मधील ऐतिहासिक भूमिका ‘राजा रतन सिंह’ तर ‘कबीर सिंह’मधील ‘कबीर’ची भूमिका या दोन्हीही प्रेक्षकांना अत्यंत भाळल्या. सध्या अशी चर्चा आहे कि, शाहिद पुन्हा एकदा नव्या प्रोजेक्टमध्ये एका नव्या रूपात दिसणार आहे. लवकरच तो एका पौराणिक चित्रपटात दिसणार आहे.

शाहिद सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘जर्सी’साठी चर्चेत आहे. चाहतेही त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूर महाभारतावर आधारित चित्रपटात ‘कर्णा’च्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे. आजकाल अभिनेता शाहिद कपूर गोव्यामध्ये राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांच्या वेब शोच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.

पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, शाहिद कपूर दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्या आगामी चित्रपटात काम करू शकतो. हा चित्रपट महाभारतातील ‘कर्ण’ यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच रॉनी स्क्रूवाला प्रॉडक्शन यांच्या अंतर्गत हा चित्रपट बनवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार शाहिदला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली आहे. यामुळे तो होकार देऊ शकतो. २०२३ मध्ये हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होण्याची देखील चर्चा आहे.

तथापि, शाहिद कपूरला ओमप्रकाश मेहरा यांनी हा चित्रपट ऑफर केला आहे की नाही? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात जॅकी भगनानी यांनी घोषित केले की, महाभारताच्या व्यक्तिरेखांनी आपल्यावर खूपच प्रभाव पाडला आहे. म्हणूनच अशा व्यक्तिरेखांवर आपण चित्रपट बनवणार आहे. ‘महाभारता’तील ‘कर्ण’ या व्यक्तिरेखेवर आधारित हा चित्रपट असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.