Take a fresh look at your lifestyle.

पंतप्रधान, थलायवा आणि खिलाडीनंतर आता रॅम्बो रणवीरची ‘Man vs Wild’मध्ये एन्ट्री

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्मपूर्ण जगातील अत्यंत लोकप्रिय असा आव्हानांचा एक कार्यक्रम डिस्कव्हरी चॅनेलवर चालतो. हा कार्यक्रम म्हणजे अर्थात ‘Man vs Wild’. हा कार्यक्रम केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगभर इतका प्रसिध्द आहे कि बस्स. अनेको तरुण आणि ऍडव्हेंचर प्रेमी हा कार्यक्रम आवर्जून पाहतात. मुख्य बाब अशी कि या कार्यक्रमामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार अर्थात खिलाडी आणि साऊथ मेगा स्टार थलायवा रजनीकांत यांसारख्या बड्या हस्तींचे चेहरे झळकले आहेत. यानंतर आता या मोठ्या हस्तींच्या यादीमध्ये लवकरच बॉलिवूडच्या रॅम्बो रणवीरचा समावेश होणार आहे.

बॉलिवूड जगतातील आघाडीचा आणि अत्यंत लोकप्रिय असा प्रसिद्ध अभिनेता ‘रणवीर सिंग’ आता या थ्रिलर आणि ऍडव्हेंचर कार्यक्रमात दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता रणवीर सिंग नुकताच या कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी परदेशी रवाना झाला आहे. या कार्यक्रमाचा होस्ट बेअर ग्रिल्स हा सर्वांचाच लाडका आहे. कारण त्याची शो होस्ट करण्याची पद्धत असेल किंवा ऍडव्हेंचरचा थ्रिल आणि फील देण्याची कला, दोन्हीही प्रेक्षकांना भावणारी आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्वत्र प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती मिळत आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रणवीर या शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत एकापेक्षा एक थ्रिलर अॅडव्हेंचर करताना दिसरणार आहे. शिवाय नेटफ्लिक्ससोबत चर्चा केल्यानंतर बेअर ग्रिल्सने रणवीरला या शोसाठी विचारले होते. नेहमीप्रमाणे रणवीरचा उत्साह इतका होता कि फार गहाण विचार करत न बसता त्याने सहमती दर्शविली आणि शोच्या चित्रीकरणासाठी परदेशी रवानासुद्धा झाला आहे. या शोसाठी रणवीर अतिशय उत्सुक आहे. मुळ्या हा शो आधीपासून बिग बजेट आणि लोकप्रिय आहे. माहितीनुसार, यावेळी पूर्वेकडील युरोपियन देशामध्ये या शोचे चित्रीकरण लवकरच सुरु होणार आहे असे सांगण्यात येत आहे.