Take a fresh look at your lifestyle.

बलात्काराचा गुन्हा दाखल होताच अभिनेत्याने केलं फेसबुक लाईव्ह; म्हणाला, तिला सोडणार नाही..

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काम देतो सांगून लैंगिक छळ करण्याचा हा प्रकार काही पहिला नाही. याआधीही सिनेसृष्टीने अशी अनेक प्रकरणे पाहिली आहेत. झगमगत्या रुपेरी पडद्याचा खरतर हाच खरा चेहरा का काय..? असा प्रश्न जिव्हारी लागतोय. एकीकडे मनोरंजन सृष्टीकडे आदराने पहिले जात असताना अशा प्रकारांमुळे इंडस्ट्रीचे नाव अनेकदा खराबी झाले आहे. आता प्रसिद्ध मल्याळम अभिनेता विजय बाबूचे नाव अशा प्रकरणात उघडकीस आले आहे. त्याचा विरोधात एका अभिनेत्रीने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर मात्र अभिनेता शांत बसला नाही तर त्याने सर्व आरोप फेटाळत संबंधित अभिनेत्रीविरोधात मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचे सांगितले आहे.

अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून एर्नाकुलम दक्षिण पोलिसांनी २२ एप्रिल २०२२ रोजी विजय बाबूविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. प्रसिद्ध मल्याळम अभिनेता विजय बाबू याचा स्वतःचा असा चाहता वर्ग मोठा आहे. मात्र या प्रकरणात त्याचे नाव समोर आल्यानंतर चाहत्यांचा रोष त्याला सहन करावा लागतोय.

यामुळे आपल्या अधिकृत फेसबुकवर लाईव्ह व्हिडीओ शेअर करीत विजय म्हणाला कि, “मी काहीही चुकीचं केलेलं नाही. मी पीडित आहे. या देशाचा कायदा तिला संरक्षण देतोय आणि मी त्रास सहन करत असताना ती आरामात आहे. तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही”. “मी मानहानीचा खटला दाखल करेन. मी तिला इतक्या सहजासहजी सुटू देणार नाही. माझ्याकडे असलेले सर्व पुरावे मी शेअर करू शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण मला तिच्या कुटुंबीयांचं नुकसान करायचं नाही. मी फक्त माझी पत्नी, आई, बहीण आणि मित्रांना उत्तर देण्यास बांधिल आहे. ‘विजय बाबू दोषी नाही’ अशा छोट्याशा बातमीने हे सर्व संपू नये असं मला वाटतं,”.

याशिवाय अभिनेत्रींच्या आरोपांबद्दल सविस्तर माहिती देताना विजय म्हणाला कि, “ती माझ्याकडे ऑडिशनसाठी आली होती आणि तिला भूमिका मिळाली. हे सर्व झाल्यानंतर आता ती कास्टिंग काउच आणि इतर गोष्टींबद्दल बोलतेय, याचा त्रास मला होत आहे. तिने मला नैराश्यात असल्याचे मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. डिसेंबर ते मार्च २०२१ पर्यंतचे तिचे सर्व मेसेज माझ्याकडे आहेत. यात ४०० हून अधिक स्क्रीनशॉट्स माझ्याकडे आहेत. तिचे जे काही आरोप आहेत, मग ते बलात्कार किंवा सहमतीने असो, ते सर्व माझ्याकडे रेकॉर्डवर आहे,” असं विजयने लाइव्हमध्ये स्पष्ट केलं आहे. संबंधित अभिनेत्रीने तक्रारीत लिहिलेय की, विजय बाबूने तिला फिल्म इंडस्ट्रीत चांगल्या संधी देण्याचं आश्वासन देऊन एर्नाकुलम इथल्या त्याच्या अपार्टमेंटमध्ये अनेकदा तिच्यावर अत्याचार केला आहे. यासाठी विजय बाबूवर बलात्कार आणि गंभीर शारीरिक इजा केल्याचा आरोप करीत तिने तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप विजय बाबूची चौकशी केलेली नाही. मात्र प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलिसांनी काही कारवाई करणे अपेक्षित असल्याचे सोशल मीडियावर बोलले जात आहे.