Take a fresh look at your lifestyle.

त्याने मला तीनदा चावा घेतला; सर्पदंशानंतर भाईजानने सांगितली आपबिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूडचा भाईजान सलमान खान आज ५६ वर्षाचा झाला आहे. वयाची ३३ वर्षे सलमानने बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली आहे आणि अजूनही गाजवतोय. त्यात सलमानचा खुशमिसाज अंदाज त्याच्या चाहत्यांना प्रचंड भावतो. यामुळे त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. आता भाईजानचा बर्थडे म्हणजे संपूर्ण जगभरातून चाहत्यांचा शुभेच्छांचा जणू पाऊस कोसळताना दिसतोय. पण यावेळी शुभेच्छांसह काळजीचीही लाट उसळतेय. याचे कारण म्हणजे अगदी एकाच दिवसांपूर्वीची घटना. सलमान त्याच्या पनवेलच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये असताना त्याला सर्पदंश झाला आणि हि बातमी पसरताच त्याच्या चाहत्यांमध्ये काळजीचे वातावरण पसरले.

अभिनेता सलमान खान याला शनिवारी रात्री त्याच्या पनवेलच्या अर्पिता फार्महाऊसमध्ये बिनविषारी साप चावला. यानंतर त्याला तात्काळ रात्री ३ वाजता एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी ९ वाजता सलमानला डॉक्टरांनी तपासले आणि त्यानंतर त्याची प्रकृती स्थिर असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याला घरी सोडण्यात आले. माहितीप्रमाणे साप बिनविषारी असल्यामुळे सलमानच्या प्रकृतीत लगेच सुधार झाला. मात्र हि बातमी इतक्या वेगाने पसरली कि, सोशल मीडियावर सलमानच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली. यानंतर सलमानने स्वतः चाहत्यांची चिंता दूर केली आहे.

सध्या सलमान आपल्या पनवेलच्या फार्म हाऊसवर बर्थडे आणि न्यू ईअरच्या सेलिब्रेशनची तयारी करतोय. दरम्यान त्याच्या फार्महाऊसमध्ये साप शिरला होता आणि या सापाने सलमानला दंश केल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. यानंतर आज वाढदिवसानिमित्त माध्यमांच्या सानिध्यातून भाईजानने चाहत्यांचे शुभेच्छा आणि प्रेमासाठी आभार मानले. शिवाय त्यांची चिंता देखील मिटवली आहे. तो म्हणाला, माझ्या फार्महाऊसमध्ये साप घुसला होता, मी काठीने त्याला बाहेर काढले. हळूहळू तो माझ्या हातात आला. मग मी त्याला सोडण्यासाठी पकडले आणि तेव्हाच त्याने मला तीनदा चावा घेतला. हा एक प्रकारचा विषारी साप होता. मी ६ तास रुग्णालयात उपचारार्थ दाखल होतो…पण मी आता ठीक आहे