Take a fresh look at your lifestyle.

आईला जाताना पाहून चिमुकलीचे भरले होते डोळे; म्हणून रात्रभराच्या शुटिंगनंतर माही परतली मुंबईला

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री माही विज नुकतीच एका ऍड शूट साठी दिल्लीला गेली होती. तिला जाताना पाहून तिची मुलगी तारा रडू लागली. ताराचे भरलेले डोळे पाहून आपसूकच माहीच्या डोळ्यातही पाणी आले होते. मात्र जाणे आवश्यक असल्यामुळे ती दिल्लीसाठी रवाना झाली. पण लेकीच्या प्रेमापोटी रात्रभर शूट करून ती अगदी पहिल्या फ्लाईटनेच परतली.

माही वीज आणि जय भानुशाली हे नेहमीच त्यांची मुलगी तारासोबत मजा मस्ती करताना दिसतात. दोघेही सोशल मीडियावर लेकीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करीत असतात. लेकीचे हट्ट पुरवण्यासाठी ते नेहमीच तयार असतात. ताराच्या बालक्रीडा पाहून चाहते तिच्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव करताना दिसतात. माही वीज ऍड शूटसाठी दिल्लीला जायला निघाली असता ताराच्या डोळ्यात पाणी आले आणि ती रडू लागली. तिला रडताना पाहून आपसूकच माहीच्या डोळ्यात देखील पाणी आले. हा आई आणि लेकीमधल्या भावुक प्रसंगाचा व्हिडीओ प्रचंड वायरल झाला. हा व्हिडीओ जय भानुशालीने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. तारा आणि माहीला भावुक झालेलं पाहून चाहते देखील भावुक झाले होते. कित्येकांनी कमेंट्स करीत आपापल्या भावना व्यक्त केल्या.

चाहत्यांच्या भावुक प्रतिक्रिया वाचल्यानंतर जयने माही परतल्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शन मध्ये असेही म्हटले आहे कि, ” मला असं वाटतं, कि माझ्या कालच्या पोस्टमुळे बरेच जण भावुक झाले आहेत, म्हणून त्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य खुलविण्यासाठी मी हा व्हिडीओ शेअर करीत आहे.” जय भानुशाली आणि माही वीजची लेक तारा हि स्टार किड्स पैकी एक असून, तिच्या अश्या बाललीलांवर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांचा वर्ग फार मोठा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.