Take a fresh look at your lifestyle.

मस्त चाललंय आमचं! घटस्फोटानंतर आमिर – किरण एकाच आठवड्यात पुन्हा दिसले एकत्र; पहा फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांचा अगदी काहीच दिवसांपूर्वी म्हणजेच आठवडाभरा पूर्वीच घटस्फोट झाला आहे. मुख्य म्हणजे एकमेकांच्या सहमतीने त्यांनी हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले होते. तसे म्हणायला ते विभक्त झाले आहेत. अर्थात आज एक घटस्फोटित कपल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात असलं तरीही ते मात्र एकत्र पूर्वीप्रमाणेच हसत आणि आनंदात एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. हे फोटो पाहिल्यावर त्यांच्या नात्यात चुटुकभरदेखील कटुता असल्याचे एकही चिन्ह दिसत नाही.

हा फोटो अभिनेता आमिर खानच्या आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. जिथे किरण आणि आमिर विभक्त असले तरीही एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य याने हा फोटो त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे. सध्या लाल सिंग चड्डा या चित्रपटाचे शुटींग लडाखमध्ये सुरू आहे. यामुळे चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट लडाखमध्ये आहे. त्यावेळी आमिर आणि किरणही एकत्र दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना अभिनेता नागा चैतन्य याने लिहिले की, ‘कृतज्ञ आहे’. चैत्यन्यला या चित्रपटात विजय सेतुपतीच्या जागेवर घेण्यात आले आहे. जो चित्रपटात आमिर खानच्या जवळच्या मित्राची भूमिका साकारताना दिसणार आहे.

बॉलिवूडचा आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ हा हॉलिवूड चित्रपट ‘फॉरेस्ट गंपचा’ हिंदी रिमेक आहे. तर चैतन्य या चित्रपटात बेंजामिन बुफोर्ड ब्लू उर्फ ​​बुब्बा हे पात्र साकारणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लाल सिंग चड्डाची संपूर्ण टिम सध्या लडाखमध्ये महत्तपूर्ण फायटींग सीन शुट करत आहे. हे संपूर्ण ४५ दिवसांचे शूटिंग शेड्युल असल्याची माहिती मिळत आहे. काहीच दिवसांपूर्वी विभक्त झालेले आमिर खान आणि किरण राव याना एकत्र पाहिल्याने चाहते मात्र संभ्रमात पडले आहेत. तसे दोघेही घटस्फोट झाल्यानंतर काहीच तासांतच एकत्र लाइव्ह देखील आले होते व आपण विभक्त झालो असलो तरीही मैत्री निरंतर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे त्यांचे एकत्र दिसणे इतके काही फरक पाडणारे ठरेल असे वाटत नाही.