Take a fresh look at your lifestyle.

अखेर राखीच्या रितेशची मुँह दिखाई संपन्न; BB 15’तील एंट्रीनंतर भाईजानने केले रोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १५ चा ढासळता TRP पाहून निर्मात्यांनी घरात तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एंट्री केली. यात बिग बॉसच्या घरात रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी यांच्यासह बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत तिच्या पतीसह सहभागी झाली. या पार्श्वभूमीवर सलमान खानने राखी सावंतला तिच्या पतीविषयी संशय निर्माण करणारा एक खतरनाक प्रश्न विचारला आहे. या प्रश्नानंतर मिळालेल्या उत्तराने मात्र थोडंसं का होईना सलमानचा डाउट क्लिअर झाला असेल असे समजू शकतो.

दरम्यान सलमान म्हणाला, ‘अखेर राखीने तिच्या पतीला बिग बॉसमध्ये आणून सर्वांना चुकीचे सिद्ध केले आहे. पण रितेश खरच तुझा नवरा आहे की तू कोणाला भाड्याने पैसे देऊन नवऱ्याचा अभिनय कर, असं सांगितले आहेस,’ सलमानचा हा प्रश्न ऐकून सर्व हसायला लागले. यानंतर राखीने तिच्या पतीची ओळख करुन दिली आणि म्हणाली, ‘रितेश तुझा मेहुणा आणि माझा एकुलता एक नवरा आहे’. यानंतर सलमानने रितेशला त्याच्या बॅकग्राऊंडबद्दल विचारले. यावर रितेश म्हणाला, ‘मी एक सॉफ्टवेअर प्रोफेशनल आहे आणि मूळचा बिहारचा आहे. पण सध्या बेल्जियममध्ये राहतो.

पुढे, ‘मला माझे लग्न झालंय हे स्वीकारण्यास फार भीती वाटत होती. माझ्या लग्नाचे काही फोटो उघड करण्याची भीती वाटत होती. यामुळे माझ्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. पण गेल्या काही भागात राखी भर शोमध्ये रडत असल्याचे पाहून मला फार वाईट वाटले. विशेष म्हणजे तिचे लग्न झाले हे सांगूनही कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नाही. अनेकांनी तिला खोटी म्हटलं,’ असेही तो म्हणाला.

यानंतर रितेशने आपल्या गुडघ्यावर बसून राखीला रोमँटिक स्टाईल प्रपोज केले आणि पुढील सात जन्म तिचा पती होण्याचे वचन दिले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. याशिवाय शमिता शेट्टी आपल्याला आवडत असल्याचे म्हणत तिलाही त्याने प्रपोज केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.