Take a fresh look at your lifestyle.

माझ्या नवऱ्याची बायको संपल्यानंतर काय करतेय राधिका? ; जाणून घ्या

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ लोकप्रिय मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील राधिकाची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. हि भूमिका अनिता दाते हिने साकारली होती. या मालिकेतील तिच्या अभिनयामुले ती घराघरांतील एक भाग होऊन गेली होती. प्रेक्षकांनी राधिकावर खूप प्रेम केले तसेच अनेक आशीर्वाद ही दिले. मात्र मालिका संपल्यानंतर राधिका कुठे आहे? काय करतेय? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तर राधिका म्हणजेच अनिता दाते हि मालिकेनंतर आता फिरायला गेली आहे. तास तिने फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे.

खरतर अनिता ‘ माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेच्या शूटिंग शेड्युलमुळे गेल्या काही वर्षांपासून चांगलीच बिझी होती. पण आता ती निवांत वेळ काढून पती आणि मैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या चाहत्यांना ही गोष्ट सांगितली आहे. अनिताने पती चिन्मय, तिची मैत्रीण अभिनेत्री पल्लवी पाटील आणि अभिनेत्री स्नेहा माजगांवकर यांचे फोटो शेअर करत या ट्रीपविषयी सांगितले आहे.

अनिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, फिरायाला जाऊया कुठे तरी …. पण कुठे? असा प्रश्न नेहमीच पडतो. आम्ही घरात दोन माणसं. मी आणि माझा नवरा चिन्मय . आम्हा दोघांच्याही आवडी-निवडी भिन्न आहेत. फिरायला जाण्याच्या संदर्भात आमचं एकमेकांशी अजिबात पटत नाही. तरी या वेळी आम्ही तो घाट घातलाच. दोन दिवस सावंतवाडी.. समुद्र आणि तीन दिवस जंगल फिरणे असे ठरले. पक्षी, प्राणी, फुलं, फुलपाखरं, डोंगर, जंगल या सगळ्याकडे कसं बघायचं? कसं फिरायच? त्या साठी त्या प्रत्येक घटकाकडे बघण्याची वेगळी दृष्टी असावी लागते. माझ्यात ती नाही. ती चिन्मयमध्ये आहे. तो त्यात अधिक रमतो. मला काही बेसिक पक्षी ओळखता येतात. पक्ष्यांचे आवाज कळत नाहीत. चिमणी चिव चिव कावळा कावं काव.. साळुंकीची बडबड. कबुतरांचे आवाज आणि अजून दोन चार पक्षी न त्यांचे आवाज माहिती आहेत. पण चिन्मयमुळे मला आता रस निर्माण होतोय. त्याने मागे लागून… आग्रही भूमिका घेऊन ही ट्रीप करवून आणली म्हणून हे घडतंय. या पाच दिवसात आम्ही खूप फिरलो… बीच, जंगल, नदीकाठ, देवराई, वेगळे वेगळे प्राणी बघितले… पक्षी ओळखायला शिकलो… खूप मासे खाल्ले… अस्सल कोकणी जेवण केलं… मौज आली… आमच्या ट्रीपमध्ये आमच्या दोन मैत्रिणी स्नेहा माजगांवकर आणि पल्लवी पाटील सोबत होत्या मग तर आणखी मज्जा… पण या ट्रीप मध्ये निसर्गाची खरी शाळा भरली ती वनोशी फॉरेस्ट होमस्टेमध्ये. ज्या तरुणाने हे उभारलं आहे, तो प्रवीण देसाई आणि त्याचा सहकारी विशाल आमचे मित्र झाले. त्यांनी सोप्प्या पद्धतीने आम्हाला गोष्टी बघायला शिकवल्या… दाखवल्या…

Leave A Reply

Your email address will not be published.